AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावती ट्रेन पकडताना तिचा तोल गेला.. पण पोलिसाच्या रुपाने देवदूतच धावून आला !

मुलगी ट्रेनमध्ये एकटीच चढली म्हणून एका महिलेने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. मात्र जीआरपी पोलिस अधिकाऱ्याने सतर्कता दाखवल्याने तिचा जीव वाचला.

धावती ट्रेन पकडताना तिचा तोल गेला.. पण पोलिसाच्या रुपाने देवदूतच धावून आला !
| Updated on: Sep 21, 2023 | 1:41 PM
Share

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : रेल्वे ही तर मुंबईकरांची लाईफलाईन. दररोज लाखो प्रवासी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेतून प्रवास करत इच्छित स्थळी जात असतात. त्यामुळेच मुंबईकरांच्या मनात या रेल्वेचे विशेष स्थान आहे. त्यांच्यासाठी ती फक्त प्रवासाचं एक साधन नव्हे तर त्यांची लाइफलाइनच आहे. अशा या रेल्वेचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पोलिस (railway journey) अधिकारी रात्रंदिवस गस्त घालत असतात. सतर्कताही बाळगतात. अशाच एका अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचा (saved life of woman) जीव वाचला. तिच्या साठी वर्दीतील तो अधिकारी देवदूतच ठरला.

ही घटना आहे मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी स्थानकावरील. तेथे एक महिला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तेवढ्यात ती तोल जाऊन खाली पडली. ती ट्रेनखाली आलीच असती, तेवढ्यात कल्याण जीआरपी पोलिसाने सतर्कता दाखवत त्या महिलेचे प्राण वाचवले. पोलिसांच्या रुपाने देवच धावून आला अशी प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करत असून त्या अधिकाऱ्याचेही खूप कौतुक होत आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार

विठ्ठलवाजी रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. नाजमी शेख नावाची 30 वर्षाची महिला आणि तिची 9 वर्षांची मुलगी रेल्वे स्टेशनवर आल्या. अंबरनाथच्या दिशेने जाणारी ट्रेन त्यांना पकडायची होती. ट्रेन आल्यानंतर मुलगी खलिफा ही ट्रेनमध्ये चढली. नाजमी ही देखील चढण्याचा प्रयत्न करत होती, मात्र ट्रेन सुरू झाल्याने तिचा हात निसटला आणि धावत्या लोकलमधून थेट फलाटावर कोसळली. ती फलाटावरून खाली पडून ट्रेनखाली सापडणार होती, मात्र तेवढ्यात विठ्ठल वाडी स्थानकात कार्यरत असलेले पोलीस माने यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तातडीने धाव घेऊन त्या महिलेला बाहेर खेचले आणि लोकल खाली जाण्यापासून वाचवले. तिचा जीव त्यांनी वाचवला.

मात्र तिची मुलगी ट्रेनमधून एकटीच पुढे गेल्याने नाजमी ही खूप घाबरली होती. मात्र गाडीतील इतर प्रवाशांनी त्या मुलीला अंबरनाथ स्थानकात सुखरुप उतरवून जीआरपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नंतर अंबरनाथ स्टेशन वर जाऊन माने यांनी नाजमी व तिच्या मुलीची भेट घालून दिली व मुलीला आईकडे सोपवले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाली असून जीव वाचवणाऱ्या पोलीस नाईक माने यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.