AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्यात भांडण लावण्याचं काम करू नका, नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठणकावलं

सत्ता होती तेव्हा काय केलं, असा सवाल त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना केला.

आमच्यात भांडण लावण्याचं काम करू नका, नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठणकावलं
नरेश म्हस्के यांचा सवाल Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 27, 2022 | 6:58 PM
Share

ठाणे : ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाखा आमच्या ताब्यात आहेत. एकाद दुसरीकडे असेल ती सुद्धा आम्ही ताब्यात घेणार असल्याचं शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी सांगितलं. नरेश म्हस्के म्हणाले, शाखा मेंटनन्स करण्याचं काम शाखा सांभाळण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालंय. शिवसेना पक्ष त्या विभागामध्ये चांगल्या परिस्थितीत आणण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीचं केलंय. त्यामुळे या सर्व शाखांवरती आमचा अधिकार आहे तो आम्ही घेणार असल्याचं म्हस्के म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी हे दौऱ्याचे करण्याचे नाटक सुरू आहे, असे प्रत्युत्तर नरेश म्हस्के यांनी दिलंय.

तुम्हाला शेतकऱ्यांसाठी करायचं होतं. मग, सत्ता होती तेव्हा काय केलं, असा सवाल त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना केला. मुख्यमंत्री होतात तेव्हा आपण काय केलं? फसव्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती एकदम घट्ट आहे. राष्ट्रवादीचा प्रवक्ता काहीतरी बोलून या युतीमध्ये काही फरक पडणार नाही, असंही म्हस्के म्हणाले.

आमचं सरकार योग्यरीत्या चालू आहे. आत्ताच नाही तर याच्या पुढील 25 वर्षे या ठिकाणी आमची सत्ता असणाराय. हे सर्व प्रकार आमच्यामध्ये भांडण लावण्यासाठी सुरू आहेत. आपण कितीही असे प्रयत्न केले तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती एकदम घट्ट आहे. असं काहीतरी राष्ट्रवादीचा प्रवक्ता बोलून या युतीमध्ये काही फरक पडणार नाही. त्यामुळे अशा गोष्टीकडे किंवा या अशा विचारांकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचं सरकार योग्यरीत्या चालू आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.