BREAKING | ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल, घडामोडींना वेग

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल झाले. त्यामुळे खळबळ उडाली. पोलीस कार्यालयात दाखल झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

BREAKING | ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल, घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:51 PM

ठाणे : ठाण्यात (Thane) सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल झाले. त्यामुळे खळबळ उडाली. पोलीस कार्यालयात दाखल झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील कार्यालयाबाहेर गाडीत बसले होते. पोलीस राष्ट्रवादीच्या कार्यालयात सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी आले होते, अशी माहिती आता समोर आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील बडे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. खरंतर आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच आरोपांतून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. आहेर यांना मारहाणीचा देखील व्हिडीओ समोर आलाय.

हे सुद्धा वाचा

महेश आहेर यांना झालेल्या मारहाणीच प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठीच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यालयात गेले. या दरम्यान इतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संबंधित कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडलीय. “तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असं तो क्लिपमध्ये बोलतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलंय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.

“एवढी हिंमत सगळं खोटी सर्टिफिकेट्स देऊन मॅनेज करुन अधिकारी झालेला व्यक्ती करतो कसा? त्याने संपूर्ण म्हाडामध्ये पाहिजे तशी 100 घरे दिली आहेत. आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. पण आता अती व्हायला लागलं आहे. मला कालच्या ट्विटमुळेच हे संभाषण मिळालं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.