शरद पवार वादग्रस्त ट्विट प्रकरणी निखिल भामरेचा ताबा ठाणे पोलिसांकडे; कोठडीसाठी ठाणे न्यायालयात हजर

| Updated on: May 19, 2022 | 5:25 PM

सध्या केतकी चितळे आणि निखिल भामरे या दोघांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून राज्यातील विविध भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणही तापल्याचे दिसत आहे. सदाभाऊ खोत, तृप्ती देसाई आणि काल पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या या अटकेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. 

शरद पवार वादग्रस्त ट्विट प्रकरणी निखिल भामरेचा ताबा ठाणे पोलिसांकडे; कोठडीसाठी ठाणे न्यायालयात हजर
निखिल भामरेचा नाशिक पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी घेतला ताबा
Follow us on

ठाणेः शरद पवारांवर (Sharad Pawar) वादग्रस्त ट्विट (Twitt) केल्या प्रकरणी नाशिक वरून ताब्यात घेण्यात आलेल्या निखिल भामरे (Nikhil Bhamare) या तरुणाला गुन्हे शाखेकडून ठाणे कोर्टात हजर करण्यात आले आहे. शरद पवार, महात्मा गांधी यांच्याबाबत त्याने वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे त्याच्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर निखिल भामरे याचा कालच ठाणे गुन्हे शाखेने स्वतः कडे ताबा घेतला होता. त्यानंत आज ठाणे सत्र न्यायालयात त्याला हजर करून तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली जाणार आहे.

निखिल याने शरद पवार यांच्यावर गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या संदर्भात एक ट्विट केले होते ज्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. केतकी चितळे आणि निखिल भामरे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. यावरुन विविध मत मतांतर व्यक्त केली जात असली तरी वैयक्तीक आणि हिणकस मजूकर कोणत्याही नेत्याविषयी लिहिला जाऊ नये असे मत विरोधकांनीही मांडले होते.

अनेक शहरांमध्ये गुन्हे दाखल

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्यानंतर निखिल भामरेवर नाशिक आणि ठाण्यामध्ये अनेक शहरांमध्ये गुन्हे दाखल आहे. निखिल भामरे याला ठाणे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर निखिल भामरे याला नाशिक कारागृह येथे ठाणे गुन्हे शाखा घेऊन जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दोघांच्या अडचणीत वाढ