‘आव जाव स्टेशन तुम्हारा’; अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांची तपासणीच नाही

| Updated on: Aug 11, 2021 | 11:47 AM

'आव जाव स्टेशन तुम्हारा' सारखी सध्या अंबरनाथ रेल्वे स्थानकाची अवस्था झाली आहे. आजपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आजपासून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. (no local pass arrangement in ambernath railway station to travel)

आव जाव स्टेशन तुम्हारा; अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांची तपासणीच नाही
ambernath railway station
Follow us on

ठाणे: ‘आव जाव स्टेशन तुम्हारा’ सारखी सध्या अंबरनाथ रेल्वे स्थानकाची अवस्था झाली आहे. आजपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आजपासून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पास पाहूनच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात असताना अंबरनाथ स्थानकात मात्र पास तपासण्याची कोणतीच सुविधा नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात कोणीही घुसत असून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसह इतर प्रवाशीही लोकलमधून प्रवास करताना दिसत आहेत. (no local pass arrangement in ambernath railway station to travel)

एकीकडे 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली असली, तरी आता सुद्धा सरसकट सर्वच प्रवासी बिनबोभाटपणे लोकलने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात या प्रवाशांच्या ओळखपत्राची किंवा कुठल्याही प्रकारची तपासणी रेल्वे पोलीस किंवा रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसल्याचं समोर आलंय.

नव्याचे नऊ दिवस

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षभरापासून सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू आहे. मात्र असं असलं तरी अंबरनाथ रेल्वे स्थानकात सरसकट सर्वच प्रवासी लोकलने बिनधास्तपणे प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर करणं गरजेचं असतानाही अशी कुठल्याही प्रकारची तपासणी रेल्वे पोलीस किंवा रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसल्याचं समोर आलंय. ज्यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली, त्यावेळी ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे रेल्वे पोलिसांनी ओळखपत्राची तपासणी करूनच प्रवाशांना आतमध्ये सोडलं. मात्र नंतर ‘आओ जाओ, घर तुम्हारा’, या म्हणीप्रमाणे जो येईल तो प्रवासी बिनधास्तपणे रेल्वेने प्रवास करत असल्याचं दिसत आहे.

पास हा फार्स आहे का?

या प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन यांच्याकडून केली जात नाहीये. त्यातच आता 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी, त्यानंतर पास अशा प्रक्रिया राबवायला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र इतकं सगळं करूनही जर रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडून ओळखपत्राची सुद्धा तपासणी होत नसेल, तर पडताळणी पास हा फार्स नेमका कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

तपासणी करूनच प्रवेश द्या

सोबतच 15 ऑगस्टपासून जर सरसकट सर्वच प्रवाशांनी रेल्वे प्रवास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला, तर त्याची जबाबदारी रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासन घेणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि आणि रेल्वे प्रशासनानं आता तरी आळशीपणा न करता रेल्वे प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (no local pass arrangement in ambernath railway station to travel)

 

संबंधित बातम्या:

बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी

महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं देशातील पहिलं राज्य ठरणार : मुख्यमंत्री

आंदोलनं कसली करताय?, कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

(no local pass arrangement in ambernath railway station to travel)