AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी

मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी
मुंबई लोकल
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 10, 2021 | 11:36 PM
Share

मुंबई : कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे करोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. उद्या (11 ऑगस्ट) सकाळपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी स्टॉल सुरु केले जाणार आहेत. (Municipal stalls near ticket counter of railway station, KDMC preparing to issue local passes)

महापालिका कार्यक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकी शेजारीच महापालिकेकडून स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. उद्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टॉल्स सुरू राहणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?

“ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

“सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेवू नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला केलं आहे.

इतर बातम्या

‘ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री’, लोकलच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा रावसाहेब दानवेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

Mumbai Local : मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे, आणखी एक अट पूर्ण करावी लागणार!

(Municipal stalls near ticket counter of railway station, KDMC preparing to issue local passes)

Follow Us
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला