ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जाहीर; वाचा नियम काय?

| Updated on: Oct 13, 2021 | 12:21 PM

मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी ही नवीन नियमावली जाहीर केली आहे. (palghar collector issues notification for thane traffic jam)

ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जाहीर; वाचा नियम काय?
Traffic Jam in Thane
Follow us on

पालघर: मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी ही नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई- ठाण्यातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यास मदत मिळणार आहे.

नव्या वाहतूक नियंत्रण नियमावलीनुसार आता गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ठराविक काळातच मुंबई ठाण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 7.30 वाजेपर्यंत आणि सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अवजड वाहनांना ठाण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सकाळी 7.30 ते 10 व दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. इतर वेळेत महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंबई – अहमदाबाद महामार्गालगत पालघरमध्ये वाहनतळ ठेवण्यात आलं आहे. येत्या 18 ऑक्टोबरपासून ही नियमावली लागू करणअ्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हे करा

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात पालघरमध्ये जाऊन वाहनतळाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या होत्या. ज्या ज्या पार्किंगमध्ये जाणार आहे त्या त्या यार्डातील गाड्यांचे स्टिकर कोड लावा. अवजड वाहने चुकणार नाहीत याची काळजी घ्या. जे चुकतील त्यांना दंड लावा. वाहतूक विभागाकडून अवजड वाहने वेळेत अडवू नका. सायंकाळी 8 नंतर वाहने या भागातून निघतात ते ठाणे नाशिक या भागात 11 पर्यंत पोहचतात, असं ते म्हणाले. सीएसएफची 45 हेक्टर जागा आहे. या ठिकाणी 2 हजार 830 अवजड वाहने उभे राहू शकतात. 8 तासाचे 100 रुपय आकारले जातात, असं सांगतानाच प्रत्येकाला ज्या यार्डात जायचे असेल त्या वाहनांना स्टिकर कोड लावा. म्हणजे 80 % वाहतूक कोंडी होणार नाही, असं शिंदे यांनी सांगितलं होतं.

ठाण्यात चार अभियंते निलंबित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालघरपाठोपाठ ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला होता. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.

 

संबंधित बातम्या:

Ameya Khopkar | तुमचा दसरा मेळावा चालतो मग नाट्यगृह का सुरु केली नाही?

दोन दिवस आधी पाळत, 5 वर्षापासून संपर्कात, पुण्यात 14 वर्षाच्या मुलीची हत्या नेमकी कशी झाली? पोलीस आयुक्तांची डिटेल माहिती

सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
(palghar collector issues notification for thane traffic jam)