एकीकडे कोरोना, दुसरीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळेना, कल्याणमध्ये भर ऊन्हात रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 09, 2021 | 3:40 PM

कल्याण डोंबिवलीत कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे (Politics over Remdesivir injection in Kalyan Dombivli)

एकीकडे कोरोना, दुसरीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळेना, कल्याणमध्ये भर ऊन्हात रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज भासत आहे. मात्र, या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. गेल्या चार दिवसांपासून कल्याणमध्ये ही भयानक परिस्थिती आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्ये कुठेही इंजेक्शन मिळालं नाही तरी एका मेडिकल स्टोअरमध्ये ते मिळेल, अशी खात्री असायची. पण त्या मेडिकलमध्येही आता पुरेसा इंजेक्शनचा साठा नाही (Politics over Remdesivir injection in Kalyan Dombivli).

कल्याण पूर्वेतील अमेय मेडिकलमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळतं, अशी चर्चा आहे. पण या मेडिकल स्टोअरमध्येही आता रेमडेसिव्हीर उपलब्ध नाही. मेडिकल चालकाने रेमडेसिव्हीरचा साठा संपला, असा बोर्ड लावलाय. तरीही रुग्णांचे अनेक नातेवाईक इंजेक्शन उपलब्ध होईल या आशेपोटी भर ऊन्हात लाईनीत उभे आहेत.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राजकारण

एककीडे कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. दुसरीकडे याच मुद्द्यावरुन आता राजकारण तापायला लागलं आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध केल्याचा दावा केला होता. याशिवाय यापुढे अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आता पुन्हा तशीच परिस्थिती उभी राहिली आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आमदार गणपत गायकवाड काय म्हणाले?

आमदार गणपत गायकवाड यांनी इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याचे आरोप करत सरकारवर टीका केली आहे. ज्या लोकांनी इंजेक्शन कमी पडू देणार नाही, असं आश्वासन दिलं होतं त्यांनी आता स्वतःचा फोन नंबर लोकांना दिला पाहिजे. म्हणजे त्यांना माहिती पडेल की, काय समस्या आहे, असं गायकवाड म्हणाले.

अमेय मेडिकलबाहेर गर्दी

गेल्या चार दिवसापासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. एकीकडे करोनाचा उद्रेक दुसरीकडे रुग्णांसाठी लागणारे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. दोन दिवस कल्याणच्या अमेय मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध होते. या इंजेक्शनसाठी नागरिकांची एकच गर्दी होत होती. आज या मेडिकलमध्ये सुद्धा इंजेक्शन नाही. या मेडिकलसमोर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नाही, असा बोर्ड लावण्यात आला आहे. तरीही रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांग लावून उभे आहेत. लोक इंजेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आश्वासन दिलं होते की, इंजेक्शन कमी होऊ देणार नाही. मात्र आज परिस्थिती अतिशय भयानक आहे. या मुद्द्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारवर टीका केली आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणीही ऐकायला तयार नाही. नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सरकारने लवकरात लवकर ही परिस्थिती आटोक्यात आणली पाहिजे, अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केलीय (Politics over Remdesivir injection in Kalyan Dombivli).

हेही वाचा : शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, कोरोना नियम नेमके कुणासाठी?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI