कल्याणमध्ये रेमडेसिव्हीरसाठी मेडिकलबाहेर शेकडोंची गर्दी, पालकमंत्र्यांनी रात्रीच इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन दिला

कल्याणमध्ये रेमडेसिव्हीरसाठी मेडिकलबाहेर शेकडोंची गर्दी, पालकमंत्र्यांनी रात्रीच इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन दिला
Remdesivir injection

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी रात्रीच इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला (Kalyan ShivSena MLA Vishwanath Bhoir assures that there will be no shortage of Remedivir injection in Kalyan)

चेतन पाटील

|

Apr 08, 2021 | 6:46 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी मेडिकल बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्याची बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने काल (7 एप्रिल) रात्री प्रक्षेपित केली. या बातमीची दखल घेऊन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी रात्रीच इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला. तसेच यापुढे या इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही, असे आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण- डोंबिवलीकरांना दिले आहे (Kalyan ShivSena MLA Vishwanath Bhoir assures that there will be no shortage of Remedivir injection in Kalyan).

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ही जवळपास 90 हजारांच्यावर पोहोचली आहे. दररोज दिवसाला 1700 रुग्ण आढळून येत आहेत. करोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वपरीने प्रयत्न करत आहे. मात्र सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. एकीकडे करोनाचा उद्रेक दुसरीकडे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्वेतील अमेय मेडिकल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी काल इंजेक्शनसाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. चार ते पाच तासांपासून लोक रांगेत उभे होते. ही बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने प्रक्षेपित केली. रात्री रांगेत उभे असलेल्या सर्व नागरिकांना इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. एवढेच नाही तर माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या घराजवळील मेडिकलमधून नागरिकांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

आमदार विश्वनाथ भोईर यांचा पालकमंत्र्यांना फोन

इंजेक्शनचा तुटवड्याची बातमी दाखवल्यानंतर कल्याण पश्चिम विधानसभाचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्वरित पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून याबाबत माहिती दिली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात गंभीर दखल घेत रात्रीच इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला आहे. यापुढे इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना दिले.

‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही’

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः विश्वनाथ भोईर यांनी लस घेतली आणि परिस्थितीच्या आढावा घेतला. नागरिकांनी लस घ्यावे असे विनंती केली, तसेच यापुढे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही, अशी ग्वाही विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे (Kalyan ShivSena MLA Vishwanath Bhoir assures that there will be no shortage of Remedivir injection in Kalyan).

हेही वाचा : Corona Vaccine : लसीकरण केंद्र जाणिवपूर्वक बंद करुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचं कारण काय? फडणवीसांचा सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें