VIDEO | कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असणाऱ्या रुग्णवाहिकेचा स्फोट, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु

औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. (aurangabad ambulance blast)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 17:24 PM, 8 Apr 2021
VIDEO | कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असणाऱ्या रुग्णवाहिकेचा स्फोट, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु
Aurangabad ambulance Blast

औरंगाबाद : शहरातील वाळूज परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा लागली आहे. स्फोट आणि आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सध्या येथे अग्निशमन दलाकडून मदत सुरु आहे. (Aurangabad ambulance blast used for transport of corona patient)

रुग्णवाहिकेचा अचाकन स्फोट

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येथे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबाद शहरातील वाळूज आणि बजाजनगर परिसरात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे नव्या कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका सेवेत आहेत. दरम्यान, येथे वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, अचानक झालेल्या या घटनेमुळे वाळूज परिसरात काही काळासाठी घबराट पसरली होती.

अग्निशमन दलाला पाचारण

रुग्णवाहिकेचा स्फोट झाल्याचे समजताच येथील नागरिकांनी बचाव पथक तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत येथे आग विझवण्याचे तसेच मदतकार्य सुरु केले. सध्यातरी या घटनेत काय जीवितहानी झाली याची माहिती समजू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा ते देवेंद्र फडणवीसांनी दाखवून द्यावं, आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? : जयंत पाटील

वास्तव नाकारुन चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे, सहकार्य करा: शरद पवार

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह घरकाम करणाऱ्या महिलांना सूट, मुंबई महापालिकेकडून विकेंड लॉकडाऊनची अतिरिक्त नियमावली जारी

(Aurangabad ambulance blast used for transport of corona patient)