Pradeep Purnekar Case: पुर्णेकर प्रकरणी कुटुंबियांचा मोठा निर्णय, थेट पोलिस ठाण्यात… मोठा गोंधळ

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूर्णकर कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Pradeep Purnekar Case: पुर्णेकर प्रकरणी कुटुंबियांचा मोठा निर्णय, थेट पोलिस ठाण्यात... मोठा गोंधळ
pradeep purnekar case
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 11:00 AM

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनाला 28 दिवस होऊन गेले आहेत. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. पूर्णेकर कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्याचे पाहायला मिळाले आहे. दोघांवरही ठोस कारवाई न झाल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुर्णेकर कुटुंबिय आणि समर्थक आज देखील आंदोलन करत आहेत.

काल दुपारी सुरु केलेला रास्ता रोको आणि पोलीस ठाण्यात केलेल ठिय्या आंदोलन आज देखील सुरुच ठेवणार. नौपाडा पोलीस ठाण्यात आज ठिय्या आंदोलन करणार असल्याची राम पूर्णेकर यांची माहिती दिली. मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात वातावरण तापलं होतं. रात्री घोडबंदर रोड वरील मानपाडा, कापूरबावडी, बाळकूम याठिकाणी रास्ता रोको करत पूर्णेकर समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळले होते.

Loading...

पहाटे ४ वाजेपर्यंत रास्ता रोको सुरु ठेवल्याने ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सहन करावा लागला आहे. प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत sit ठाणे गुन्हे शाखा यांनी काय काय तपास केला याची माहिती तपास अधिकारी पुर्णेकर कुटुंबीय आणि महाविकास आघाडी यांना देणार आहे. मुख्य आरोपी म्हणून पुर्णेकर कुटुंबीयांनी आरोप केल्या प्रमाणे मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या बाबत देखील जाब विचारणार आहे. आता पर्यंत प्रदीप पुर्णेकर प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना ठाणे न्यायालयाने न्यायालयिन कोठडी सुनावली आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us