Swine Flu : कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचा धोका वाढला! दोघांचा मृत्यू, 22 रुग्णांवर उपचार सुरू

ठाणे शहरापाठपोठ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढत आहेत.

Swine Flu : कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचा धोका वाढला! दोघांचा मृत्यू, 22 रुग्णांवर उपचार सुरू
कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचा धोका वाढला!
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 10:35 PM

कल्याण : ठाणे शहरानंतर आता जिल्ह्यात स्वाईन फ्लू (Swine Flu)चा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता स्वाईन फ्लूचा धोका (Risk) वाढल्याचे समोर आले आहे. कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यात 48 नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, 24 रुग्ण बरे झाले आहेत. तर 22 रुग्णांवर उपचार सुरु असून, उपचारादम्यान 2 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. यामुळे महापालिकेने सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतःला आयसोलेट करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीची जनजागृती मोहिम

ठाणे शहरापाठपोठ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढत आहेत. तर स्वाईन फ्ल्यूची रुग्णसंख्याही वाढत असून जून महिन्यापासून आतापर्यंत 48 नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. यात 85 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण सहव्याधिग्रत होते. एकूण 48 पैकी 24 रुग्ण बरे होवून घरी परतले असून, 22 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तर महानगर पालिकेकडून रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच वसंत व्हॅली येथे स्वाइन फ्लूचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असल्याचीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Risk of swine flu increased in Kalyan Dombivli, two died, 22 patients under treatment)