AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत हॉटेलमध्ये कुणाबरोबर थांबायचे हे बोललो तर… संजय शिरसाट यांचा मोठा इशारा

हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कधी उडता पंजाब होऊ शकत नाही. या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. काही लोकांना ही मळमळ आहे म्हणून ते महाराष्ट्राचे नाव बदनाम करत आहेत. राजकारण करत असताना तुम्ही एखाद्यावर टीका करणे ठीक आहे. पण महाराष्ट्राची बदनामी करू नका हे त्यांना सांगणं आहे, असं सांगतानाच कोणत्याही ड्रग्स माफियाला आणि त्याच्याशी संबंधितांना सरकार सोडणार नाही, असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं.

संजय राऊत हॉटेलमध्ये कुणाबरोबर थांबायचे हे बोललो तर... संजय शिरसाट यांचा मोठा इशारा
sanjay shirsat Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2023 | 3:22 PM
Share

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 4 नोव्हेंबर 2023 : आजकाल संजय राऊत यांना लोकांचा काय काय पाहायचं असतं? स्वतः राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो तर मग तुम्हाला कळेल. कोणत्या हॉटेलवर राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिल कोण भरायचं हे समजले. जे आज तुमच्या नावाने रडत आहेत, तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे, असं सांगतानाच कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका, असं आवाहन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

कोणत्याही खासदाराने ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असेल तर त्याला पुराव्यासहीत चोख उत्तर दिलं जाईल. हॉटेलच्या नावासहीत, रूम नंबर सहीत सर्व पुरावे देऊ शकतो, असा इशाराच आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

तर समर्थन करू

एल्विश यादव प्रकरणावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. एल्विश यादववर काही लोकांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असं स्वतः यादवने सांगितल आहे. हिंदुत्वावर बोलणाऱ्या, लोकप्रिय असणाऱ्या माणसावर कुठलेही आरोप करून त्याला कोणत्याही प्रकारे अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत.राऊत आणि त्यांच्या ठाकरे गटाने हिंदुत्व तर सोडलेलच आहे. परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत.

मला वाटतं हे चुकीचं आहे. तो जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. पण विनाकारण आरोपी बनवण्याचा प्रकार बरोबर नाही. म्हणून आम्ही त्याच समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

15 आमदार शिंदे गटात येणार

31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत पोपट आहे. ते सध्या पोपटाच्या भूमिकेत आहेत. आधी दलालाच्या भूमिकेत होते. आता पोपटाच्या भूमिकेत आहेत म्हणून त्याची चिंता करू नका. सरकार काही जाणार नाही. जाणार असतील तर हे जाणार आहेत. त्यांच्याजवळ असलेले 15 आमदार जाणार आहेत. 31 डिसेंबर नंतर त्यांचे 15 आमदार शिवसेनेकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो, असा दावा त्यांनी केला.

त्याला तुरुंगात टाका

ललित पाटीलसह 14 लोकांवर कारवाई केलेली आहे. तो आता 10 वर्ष तरी सुटणार नाही. तुरुंगातून सुटणार नाही या भीतीपोटी तो पळाला हे त्याने कबूल केलेलं आहे. त्यामुळे अशा ड्रग्स माफियाच्या मागे जो कोणी असेल मग तो आमदार, खासदार, मंत्री असो त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे. आम्ही स्वतः ती मागणी करतोय. समाजाला बिघडवणारा कोणताही ड्रग्स माफीया असला तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्या संबंधित जरी कोण असेल तर त्यालाही जेलमध्ये टाकलं पाहिजे हि स्पष्ट भूमिका शिंदे सरकारची आहे, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंचं स्वागत

मनसे नेते राज ठाकरे यांनी वरळीच्या बीडीडी चाळीची पाहणी केली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. वरळी कुण्या एकट्याची प्रॉपर्टी आहे का? वरळीमध्ये असलेले मुस्लिम, दलित बांधव, पोलीस कर्मचारी, त्या पोलीस कर्मचा एक हक्काचं घर मिळावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 16 लाखांमध्ये घर मिळण्याची पोलिसांची मागणी होती.

ते देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्याला समर्थन देण्यासाठी जर राज ठाकरे गेले असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघात येऊन जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्यांचं स्वागत करा, मतदारसंघ ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका