AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांची राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोर्टाचा निर्णय…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मिश्किल भाष्य केलं.

राज ठाकरे यांची राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोर्टाचा निर्णय...
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 12, 2023 | 12:21 PM
Share

ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालात शिंदे सरकारला अभय मिळालं आहे. मात्र, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्याच बाजूने निकाल आल्याचे दावे दोन्ही बाजूने होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याविरोधात केसेस सुरू असताना मला कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस यायची. त्या नोटीशीतील भाषा अत्यंत किचकट असते. त्यातून मला अटक केलीय की सोडलंय हेच कळत नाही. काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. प्रोसेज चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. बाहेरचाच पक्ष राहिला पाहिजे. मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार? कोर्टाचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

माझा वेळ वाया घालवू नका

उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारेने राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे, असं विचारलं असता, उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यांचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे. माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलंच पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला होता. आताही मुख्यमंत्र्यांना तोच सल्ला देणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे. आधीचे नाही राहिले त्यामुळे हे सर्व घडलं आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

अंदाज घेण्यासाठी आलो

यावेळी त्यांनी ठाण्याच्या दौऱ्यावरही भाष्य केलं. विधानसभा आणि लोकसभेचा अंदाज घेण्यासाठी मी दौऱ्यावर आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेणार आहे, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी कोणत्या पक्षाबरोबर युती करणार या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?