कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, विसर्जन घाटाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, विसर्जन घाटाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, विसर्जन घाटाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पातील अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे येत्या 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत. सदरची किरकोळ सर्व कामे पूर्ण होताच सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून अॅम्पी थिएटरचे लोकार्पण करणेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 21, 2022 | 4:48 PM


ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या विविध कामाची आज प्रशासक तथा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांनी पाहणी करून सविस्तर आढावा (Review) घेतला. यावेळी या प्रकल्पातील अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून लोकार्पण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले. यावेळी माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, माजी नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते. (Thane Municipal Commissioner inspected Kopari Waterfront Development, Immersion Ghat)

आयुक्तांनी पाहणी करुन सविस्तर आढावा घेतला

ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुशोभीकरणाचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असून या सर्व कामाची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज पाहणी केली. या ठिकाणी करण्यात अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट(मीठबंदर रोड )रस्ता व पदपथाचे नूतनीकरण, शौचालय, अॅम्पी थिएटर, बैठक व्यवस्था, उद्यान, वाहनतळ, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत रोषणाई, जेट्टी रस्त्याचे नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांचे जतन करण्याकरीता चौथऱ्याचे बांधकाम, दशक्रिया विधीकरीता चौथरा आदी सुविधांची त्यांनी पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पातील अॅम्पी थिएटर, सुशोभीकरणाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे येत्या 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत. सदरची किरकोळ सर्व कामे पूर्ण होताच सक्षम प्राधिकरणाशी चर्चा करून अॅम्पी थिएटरचे लोकार्पण करणेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. (Thane Municipal Commissioner inspected Kopari Waterfront Development, Immersion Ghat)

इतर बातम्या

Thane Cylinder Blast : ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण भाजले, कळव्यात उपचार

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाण, डोळ्यात आणि डोक्यात खिळे घुसले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें