Thane Cylinder Blast : ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण भाजले, कळव्यात उपचार

Thane Cylinder Blast : ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण भाजले, कळव्यात उपचार
ठाण्यात सिलेंडर स्फोट
Image Credit source: टीव्ही9

दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गणेश थोरात

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 21, 2022 | 9:59 AM

ठाणे : सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) होऊन 4 कामगार जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यात (Thane) एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली. रणजित सिंग असं मालकाचं नाव आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंग मागे शिवशक्ती नगरात ही घटना घडली. दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भारत गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्फोट

सिलेंडरचा स्फोट होऊन चौघे कामगार जखमी झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कळव्यातील एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली.

सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले

कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंगमागे शिवशक्ती नगरात ही घटना घडली. दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी 1-रेस्क्यू वाहनसह उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आहे.

दुखापतग्रस्त कामगारांची नावे :

1) सत्यम मंगल यादव (वय-20)
2) अनुराज सिंग (वय-29)
3) रोहित यादव (वय-20)
4) गणेश गुप्ता (वय-19)

संबंधित बातम्या :

कळव्यात घरगुती सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही मात्र 6 घरांचे नुकसान

Cylinder Blast | वरळीत सिलेंडर स्फोट, चार महिन्याच्या बाळासह चौघे होरपळले

धारावीत सिलिंडरचा स्फोट, 14 जण होरपळले; दोघांची प्रकृती चिंताजनक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें