Ulhasnagar Crime : उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाण, डोळ्यात आणि डोक्यात खिळे घुसले

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाण, डोळ्यात आणि डोक्यात खिळे घुसले
उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाण
Image Credit source: टीव्ही9

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील दुधनाका परिसरात वासुशेठ यांचा तबेला आहे. या तबेल्यात पप्पू भारती आणि धर्मेंद्र हे दोघे एकत्र काम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मालकाने धर्मेंद्र याला कामावरून काढून टाकलं. यानंतर पप्पू याने मालकाकडे आपल्याबाबत चुगली केल्यानेच मालकाने आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा संशय धर्मेंद्र याला होता.

निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 21, 2022 | 1:18 AM

उल्हासनगर : मालकाला चुगली केल्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्याच जुन्या सहकाऱ्याला खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण (Beating) केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या घटनेत मारहाण करण्यात आलेला तरुण गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. पप्पू भारती असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे तर धर्मेंद्र असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आरोपी धर्मेंद्र याच्याविरोधात आयपीसी 326 आणि 452 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. धर्मेंद्र सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (In Ulhasnagar, a young man was severely beaten by an old colleague on suspicion)

पीडित झोपेत असताना आरोपीने हल्ला केला

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील दुधनाका परिसरात वासुशेठ यांचा तबेला आहे. या तबेल्यात पप्पू भारती आणि धर्मेंद्र हे दोघे एकत्र काम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मालकाने धर्मेंद्र याला कामावरून काढून टाकलं. यानंतर पप्पू याने मालकाकडे आपल्याबाबत चुगली केल्यानेच मालकाने आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा संशय धर्मेंद्र याला होता. यातूनच शनिवारी 19 मार्च रोजी रात्री पप्पू हा तबेल्यात झोपलेला असताना धर्मेंद्र हा त्याला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने तिथे आला. त्याने खिळे असलेल्या दांडक्याने पप्पू याला मारहाण केली. यात पप्पूच्या उजव्या डोळ्यावर, डोळ्याच्या बाजूला, उजव्या कानाच्या मागे, डोक्यावर आणि गालावर मारहाण केली.

झोपेत असताना ही मारहाण झाल्याने काही कळायच्या आतच पप्पू याला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या. त्यामुळे त्याला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून थेट मुंबईच्या सायन इथल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. या घटनेनंतर हिललाईन पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद करडकर यांनी दिली आहे.

अंबरनाथमध्ये सराईत चोरटा जेरबंद

अंबरनाथ परिसरात चोरी करणाऱ्या एका चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याने एक चोरी आणि दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. देवप्रकाश राय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पोलिस या आरोपीच्या मागावर होते. अखेर या चोरट्याला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. पोलिस चौकशीत आरोपीने चोरी आणि घरफोडीच्या घटनांचीही कबुली दिली आहे. आरोपीची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (In Ulhasnagar, a young man was severely beaten by an old colleague on suspicion)

इतर बातम्या

Ambernath Theft : अंबरनाथमध्ये चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल, चोरट्याला पोलिसांकडून बेड्या

Yavatmal Murder : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें