AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Suicide : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

मयत महिला तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रहिवासी आहे. मयत महिला दुर्गाच्या पतीला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत दररोज दुर्गाचा पती तिला मारहाण करीत असे. मयत महिला शुक्रवारी कामाला जात आहे असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही.

Bhandara Suicide : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:27 AM
Share

भंडारा : पतीच्या जाचा (Harassing)ला कंटाळून विवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पांजरा येथे घडली आहे. दुर्गा मुकेश टांगले (35) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीत बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. (A married woman commits suicide by jumping into a well after being harassed by her husband)

पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीची आत्महत्या

मयत महिला तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रहिवासी आहे. मयत महिला दुर्गाच्या पतीला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत दररोज दुर्गाचा पती तिला मारहाण करीत असे. मयत महिला शुक्रवारी कामाला जात आहे असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही. त्यामुळे घरच्यांनी इकडे तिकडे शोधाशोध घेत केली. परंतु कुठेच तिचा थांगपत्ता लागला नाही. दोन दिवसांनी रविवारी दुपारच्या सुमारास पांजरा येथील मेश्राम नामक यांच्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह तरंगत असताना गावकर्‍यांना दिसला. विहिरीमध्ये मृतदेह असल्याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी महिलेचे शव विहिरीबाहेर काढत उत्तरोत्तर तपासणी तुमसर रुग्णालयात पाठविले आहे. दुर्गाच्या दुखद मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रकाश मानकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मानकर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. मात्र सततच्या नापिकीमुळे शेतीच न आल्यामुळे त्यांना कर्ज फेडता येत नव्हते. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या मानकर यांनी भावाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. (A married woman commits suicide by jumping into a well after being harassed by her husband)

इतर बातम्या

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती

युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहावरील छापेमारीत 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 22 लाखांचे दागिने जप्त

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.