Nagpur Crime : नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार

Nagpur Crime : नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार
नागपुरात एका आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार

पीडित बालिका गतिमंद असून ती घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

सुनील ढगे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 20, 2022 | 7:59 PM

नागपूर : अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. अशीच एक मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नागपूरमधील इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबाग परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय गतिमंद बालिके (Minor Girl)वर आज दुपारी बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या घराच्या पाठीमागे राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने बलात्कार केला झाले. पीडित बालिका गतिमंद असून ती घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमामवाडा पोलिसाकंडून आरोपीला बेड्या

पीडित मुलगी दुपारी आपल्या घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तात्काळ इमामवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सूरज लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी पीडितेला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपीचा मुलगाही काही गुन्ह्यांमध्ये सध्या तुरुंगात

आरोपी लोखंडे हा घरी एकटाच राहतो. त्याची पत्नी काही घरगुती कारणामुळे त्याला सोडून गेली आहे. तर त्याचा मुलगा काही गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहे. आरोपीच्या मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान या घटनेमध्ये आरोपीला आणखी कोणी मदत केली का याची चौकशी पोलीस करत आहेत. शेजाऱ्याने बलिकेवर अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे परिसरात चिंतेच वातावरण निर्माण झालं असून, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कारावासाची शिक्षा

आंबेगाव तालुक्यात सात वर्षापूर्वी मजुर कामगाराच्या 10 वर्षीय पिडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एम अंबाळकर कोर्टाने 20 वर्ष सक्षम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर गुंजाळ असे शिक्षा सुनावलेल्या नराधमाचे नाव आहे. सात वर्षापूर्वी चिमकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावणी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होती. या दरम्यान सरकारी वकील अँड रजनी नाईक यांनी 7 साक्षीदार तपासत असे दुष्कृत्ये करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्याची शिफारस केली होती.

इतर बातम्या

VIDEO : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला, माजी नगरसेवकाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न

Pimpri crime| चिंचवडमध्ये व्यवसायासाठी मदत मागत वृद्धाला 35 लाखांना लुटलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें