AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला, माजी नगरसेवकाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न

गिरीश महाजन यांची द्वितीय कन्या श्रेया हिचा अजय गुजर यांचे चिरंजीव अक्षय यांच्यासोबत आज जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या निवासस्थानाजवळ विवाह सोहळा पार पडत आहे. या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

VIDEO : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला, माजी नगरसेवकाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न
गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 6:53 PM
Share

जळगाव : लग्नाचे कार्यक्रम म्हटले की त्यात पाकिटमार आलेच! आता तर चक्क गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नातही पाकिटमारानं डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पण पाकिटमाराचा हा प्रयत्न फसला. पाकिट चोरण्यासाठी लग्नात घुसलेल्या या चोरट्या (Thief)ला मग लग्नातील इतर कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय. हा सगळा प्रकार भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मुलीच्या लग्नात घडल्यानं चर्चा झाली नसती तरच नवल! नेमकं घडलही तेच! आता या भामट्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाले केलं जाईल. पण थेट गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात घुसून पाकिट चोरण्यासाठी आलेल्या या चोरट्याला लग्नात आलेल्या इतरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आता चोरट्याला कार्यकर्त्यांनी अखेर हुसकावून लावलंय. (Attempt to steal money from former corporator at Girish Mahajan’s daughter’s wedding)

सकाळी विवाह पार पडल्यानंतर अनेक मान्यवर गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी येत होते. यावेळी घराजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी एक पाकिटमार तेथे घुसला. या पाकिटमाराने जामनेरच्या नगरसेवकाच्या खिशात हात घालून पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब नगरसेवकाच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच सतर्क होत चोरट्याचा हात पकडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या चोरट्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे विवाह मंडपाबाहेर एकच तारांबळ उडाली होती.

गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पार पडतोय विवाह

गिरीश महाजन यांची द्वितीय कन्या श्रेया हिचा अजय गुजर यांचे चिरंजीव अक्षय यांच्यासोबत आज जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या निवासस्थानाजवळ विवाह सोहळा पार पडत आहे. या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लग्न ठिकाणी आकर्षक सजावट केली असून कमळाच्या फुलांच्या प्रतिकृती लावल्या आहेत. सकाळी साडे दहा वाजता विवाह सोहळ्याच्या विधींना सुरवात झाली. सायंकाळी भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह अनेक राजकीय मंडळी आणि दिग्गज लोकांनी हजेरी लावली आहे. (Attempt to steal money from former corporator at Girish Mahajan’s daughter’s wedding)

इतर बातम्या

Pimpri crime| चिंचवडमध्ये व्यवसायासाठी मदत मागत वृद्धाला 35 लाखांना लुटलं

सोनलला मारण्यासाठी मोसमीनं 4 लाखाची सुपारी दिली, मारेकऱ्याला Bike वरुन घरापर्यंतही सोडलं! पण…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.