सोनलला मारण्यासाठी मोसमीनं 4 लाखाची सुपारी दिली, मारेकऱ्याला Bike वरुन घरापर्यंतही सोडलं! पण…

Gondia attack : सोनल शर्मा हीच्यावर कुरीयर बॉयच्या वेशात आलेल्या तरुणानं चाकून वार केला. घरात घुसून सूरजनं केलेल्या हल्ल्यावेळी 11 वर्षांची श्रेयाशी शर्मा ही मुलगी तिथं होतं.

सोनलला मारण्यासाठी मोसमीनं 4 लाखाची सुपारी दिली, मारेकऱ्याला Bike वरुन घरापर्यंतही सोडलं! पण...
वकील महिलेनं का दिली महिलेलाच मारण्याची सुपारी?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:11 PM

गोंदिया : 9 मार्च रोजी गोंदिया शहरात धक्कादायक घटना घडली. एका गृहिणीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून गृहिणी (House wife) थोडक्यात कशीबशी बचावली. या थरारक घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्या करण्याच्या उद्देशानं आलेल्या आरोपीसह एका महिलेला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका वकील महिलेनं गृहिणीची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असा खळबळजनक खुलासा पोलिसांच्या तपासातून करण्यात आलाय. एका तरुणानं कुरीअर बॉयच्या वेशात येऊन महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूनं वार (attack on women) केले होते. हल्ल्याच्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संपूर्ण प्रकरणाचं गूढ उकललंय. चार लाखांची सुपारी महिलेची हत्या (attempt to murder) करण्यासाठी देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी हत्या करण्यासाठी आलेल्या हल्लेखोर आरोपीसह गृहिणीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या एका वकील महिलेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

गोंदिया शहराच्या शिवलाईन भागात ही घडना घडली होती. 9 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. गोंदिया शहाराच्या शिवलाईन भागात मोसमी मुखर्जी या महिलेनं सोनल शर्मा या महिलेच्या हत्येची सुपारी दिली. सूरज रावते याला हत्येची सुपारी देण्यात आली. त्यासाठी मोसमी मुखर्जी या महिलेनं सूरजला चार लाख रुपये दिले. मोसमी मुखर्जी हीनं स्वतः सूरजला स्वतःच्या दुचाकीवरुन जिचा खून करायला आहे, तिच्या घरी सोडलं. सूरजला घर दाखवल्यानंतर मोसमीनं घटनास्थळावरुन पळ काढला होता. मोसमीला सोनल शर्मा या महिलेचा काटा काढायचा होता. म्हणून मोसमीनं सूरजला हत्येची सुपारी दिली होती.

..पण हल्ल्याचा प्रयत्न फसला!

सोनल शर्मा हीच्यावर कुरीयर बॉयच्या वेशात आलेल्या तरुणानं चाकून वार केला. घरात घुसून सूरजनं केलेल्या हल्ल्यावेळी 11 वर्षांची श्रेयाशी शर्मा ही मुलगी तिथं होतं. श्रेयाशीनं या हल्ल्यावेळी धाढस दाखवलं आणि आपल्या आईचे प्राण या हल्ल्यातून वाचवले. दरम्यान, सैरभैर झालेल्या हल्लेखोर सूरजनं आपला प्रयत्न फसलाय, हे पाहून घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी दुचाकीवरुन पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

या खळबळजनक प्रकाराची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. गोंदिया पोलिसांनी याप्रकरणी आपली तपास यंत्रणा कामाला लावली. त्यानंतर मोठया शिताफिनं त्यांनी या हल्ल्याप्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. कुरीअर बॉय बनून आलेल्या सूरजला पोलिसांनी त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या. यानंतर पोलिसांनी आरोपी वकील महिला मोसमी मुखर्जीलाही अटक केली. पोलिसांनी या दोघांचीही कसून चौकशी केली. त्यादरम्यान, चार लाख रुपयांची सुपारी या महिलेनं सूरजला दिली होती, हेही उघडकीस आलंय. पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

का केला हल्ला?

दरम्यान, पोलिसांनी मोसमी मुखर्जी यांच्या संदर्भात तपास केला असता मोसमी ह्या गोंदिया शहरात वकील असल्याचे उघडकीस आलंय. पीडित सोनल शर्मा यांचे पती आशिष शर्मा यांची मोसमी यांच्याशी जुनी ओळख असल्याचे तपासात उघडकीस आलंय.नेमक्या कुठल्या कारणा वरून आरोपीने आपल्या ओळखीच्या इसमाच्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला, या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे गोंदिया शहरात एकच खळबळ उडाली असून महिलांमध्ये दहशत पसरली होती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.