AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे महानगरपालिकेकडे मशिदीच्या नोंदीच नाही, माहितीच्या अधिकारात धक्कादायक बाब उघड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत तसेच अनाधिकृत मशिदीं, मदरशांची माहिती त्यांनी मागविली होती. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेकडून त्यांना स्पष्टीकरण देत त्यांना सांगण्यात आले की, सदर माहिती विभागात उपलब्ध नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेकडे मशिदीच्या नोंदीच नाही, माहितीच्या अधिकारात धक्कादायक बाब उघड
15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा अन् 10 टक्के सूट मिळवा !Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 06, 2022 | 4:39 PM
Share

ठाणेः मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी राज्यातील मशिदीवरीरल भोंग्याचा (Loudspeakrs) प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा (Aurangabad Meeting) झाल्यानंतरही अजून हे राजकीय नाट्य सुरुच आहे. त्यातच मनसेच्या अनेक नेत्यांची धरपकड सुरु असून मागील मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेताना महिला पोलिसाला धक्का लागून त्या पडल्यानेही राज ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर जनसामान्यातून प्रचंड टीका झाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या राजकीय नाट्यनंतर राज्यात सगळीकडे सामाजिक वातावरण गढूळ केलेले असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी माहितीच्या अधिकाराखाली (Right to Information) ठाणे महानगर हद्दीतील अधिकृत तसेच अनाधिकृत मशिदीं, मदरशांची माहिती मागवली होती. त्यानंतर त्यांना जी माहिती मिळाली त्या माहितीमध्ये ठाणे महानगरपालिकेकडे मशिदीच्या नोंदीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीच्या अधिकारात माहिती उघड

माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे असून आता मनसे या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत तसेच अनाधिकृत मशिदीं, मदरशांची माहिती त्यांनी मागविली होती. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेकडून त्यांना स्पष्टीकरण देत त्यांना सांगण्यात आले की, सदर माहिती विभागात उपलब्ध नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

महिती उपलब्ध का नाही

ठाणे महानगरपालिकेकडूनच असे स्पष्टीकरण देण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिसरातील मशिदींची माहिती का महानगरपालिकेकडे का उपलब्ध नाही असा सवालही यावेळी उपस्थित केला जात आहे.

हिंदू मंदिरांचाही मुद्दा पुढे

ठाणे महानगरपालिकेच्या परिसरातील मशिदीची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडेच नसल्याने आता यावर मनसे काय भूमिका घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक मशिदीवर भोंगे उतरवण्याचा राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मशिदींबरोबरच हिंदू मंदिरांचाही मुद्दा पुढे आला होता. त्यामध्ये शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील भोंगे उतरवण्याबाबत नागरिकांनीच राज ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.