AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळव्यातील चार, पाच ते आठ मजली इमारतींवर हातोडा, अनधिकृत बांधकामाविरोधात ठाणे महापालिकेची मोठी कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु आहे.

कळव्यातील चार, पाच ते आठ मजली इमारतींवर हातोडा, अनधिकृत बांधकामाविरोधात ठाणे महापालिकेची मोठी कारवाई
अनधिकृत बांधकामाविरोधात ठाणे महापालिकेची मोठी कारवाई
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 05, 2021 | 8:05 PM
Share

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु आहे. ठाणे महापालिकेकडून आज (5 ऑगस्ट) कळवा प्रभाग समितीमधील 6 अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली आहे. तसेच महापालिकेची यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे.

चार, पाच आणि सहा मजली इमारतींवर पालिकेचा हातोडा

या कारवाई अंतर्गत कळवा प्रभाग समितीमधील जॅम फॅक्टरी, खारेगाव येथील स्टील्ट अधिक 6 मजली अनधिकृत इमारत तसेच जामा मशिद, कळवा नाका येथील तळ अधिक 4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. हिरादेवी मंदिर, खारेगाव येथील स्टील्ट अधिक 5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून 7 रुमच्या भिंती तोडण्यात आल्या आहेत.

यासोबतच मच्छी मार्केट जवळील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयुरेश सोसायटीची स्टील्ट अधिक 8 मजली अनधिकृत इमारतीच्या 14 रुमच्या भिंती तोडण्यात आल्या आहेत. तसेच टाकोली मोहल्ला येथील तळ अधिक 9 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान दिवा येथे बांधण्यात आलेल्या 2 चाळीमधील अनधिकृत खोल्या तोडण्यात आल्या.

उप आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. महापालिकेने काल (26 जुलै) अनधिकृत बांधकाम करुन जमीन बळकावणाऱ्या लॉज आणि हॉटेल व्यवसायिकांना दणका दिला. महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित लॉज आणि हॉटेल जमीनदोस्त केले होते.

दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेने 24 जुलैला दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडले होते. तसेच कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं होतं.

दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

संबंधित बातमी :

8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली