8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच

ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेली कारवाई अद्याप सुरुच आहे. ठाणे महापालिकेने आजदेखील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली.

8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच
8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच

ठाणे : ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेली कारवाई अद्याप सुरुच आहे. ठाणे महापालिकेने आजदेखील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली. महापालिकेने आज (27 जुलै) कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील 4 अनधिकृत बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कसित केली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

दिवसभरात ‘या’ ठिकाणी कारवाई

या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील भुसार अळी आणि कुंभार अळी येथील दोन अनधिकृत 8 मजल्याच्या इमारतीतील 14 खोल्यांचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बाळकूम पाडा नं.1 येथील स्टील्ट + 6 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करून इमारतीचे 3 मजले आणि 24 खोल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समितीममधील उपवन येथील स्काईनलाईन हुक्का पार्लर आणि येऊर येथील शामियाना हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.

संबंधित निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कल्पिता पिंपळे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. महापालिकेने काल (26 जुलै) अनधिकृत बांधकाम करुन जमीन बळकावणाऱ्या लॉज आणि हॉटेल व्यवसायिकांना दणका दिला. महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित लॉज आणि हॉटेल जमीनदोस्त केले होते.

दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेने दोन दिवसांपूर्वी म्हणजे 24 जुलैला दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडले होते. तसेच कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं होतं.

दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

हेही वाचा :

लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडाकेबाज कारवाई सुरुच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI