AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात आज रणकंदन, ठाकरेंच्या महामोर्चाला परवानगी, ‘या’अटी पाळाव्या लागणार

सोमवारी रात्री रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. या घटनेवरून शिंदे-भाजप विरुद्ध ठाकरे असं राजकारण रंगलंय.

ठाण्यात आज रणकंदन, ठाकरेंच्या महामोर्चाला परवानगी, 'या'अटी पाळाव्या लागणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2023 | 11:40 AM
Share

निखिल चव्हाण,  ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकिकडे रोशनी शिंदे यांना पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलंय तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महामोर्चाला अखेर ठाणे पोलिसांची परवानगी मिळाली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात ठाण्यात आज पोलीस आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला जाणार असून पोलिसांनी या प्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे आजच्या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागंलय.

शाब्दिक युद्ध पेटलं

रोशनी शिंदे यांना सोमवारी काही महिलांनी मारहाण केली. या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या, असा आरोप रोशनी शिंदे यांनी केला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. यावरून संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. हे फडतूस गृहमंत्री आहेत, असे शब्द वापरले. यावरून देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या दिग्गजांनी प्रत्युत्तर दिले. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरलाय.

महामोर्चाला परवानगी

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील महामोर्चाला ठाणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यापूर्वी पुढील अटींसह एकूण १७ अटी घालण्यात आल्या आहेत.

  • सदर कार्यक्रम दिलेल्या वेळी तारखेस व ठिकाणी सुरू करून मुदतीत संपविण्यात यावा.
  •  कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता पार पाडण्यात यावा.
  •  कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्य देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शीत करू नये.
  •  सदरवेळी आक्षेपार्य, प्रक्षोभक, अगर कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करू नयेत आक्षेपार्य प्रक्षोभक गाणी गाऊ नयेत अथवा वाजवु नयेत.
  • व्यक्ति, प्रेत, किंवा आकृत्या त्यांच्या प्रतीमा त्यांचे प्रदर्शन करणे किंवा जाळणे अशी कृत्य करू नये.
  • सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोणताही प्रकारे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवून शांततेस बाधा पोहचेल अश्याप्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

रोशनी शिंदे लिलावती रुग्णालयात

सोमवारी रात्री रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शिंदे यांना मारहाणीच्या जखमा आहेत तसेच त्यांना काही ठिकाणी मुका मार लागल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली होती. आज पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात हलवण्यात आलंय.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.