AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत कोणत्या हॉटेलमध्ये, कोणाबरोबर थांबायचे, त्या रूमचा नंबरही देऊ शकतो; शिवसेनेच्या आमदाराचा थेट इशारा

Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत सध्या पोपटाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी आमच्या सरकारची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आमदारांकडे लक्ष द्यावं. त्यांचे 15 आमदारही लवकरच आमच्याकडे असतील, असा दावा शिवसेनेच्या आमदाराने केला आहे. त्यांना राऊतांना थेट इशारा दिला आहे.

संजय राऊत कोणत्या हॉटेलमध्ये, कोणाबरोबर थांबायचे, त्या रूमचा नंबरही देऊ शकतो; शिवसेनेच्या आमदाराचा थेट इशारा
संजय राऊत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 04, 2023 | 3:11 PM
Share

ठाणे | 04 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ड्रग्जच्या तस्करी प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना आमदाराने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आजकाल संजय राऊत यांना लोकांचं काय चाललंय हे पाहायचं असतं. संजय राऊत स्वत: कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो. तर मग तुम्हाला कळेल ते कोणत्या हॉटेलवर संजय राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिलं कोण भरायचं… जे आज तुमच्या नावाने रडतायेत तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे, असा घणाघात संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

चोख उत्तर देण्याचा शिरसाट यांचा इशारा

कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका. ड्रग्ज सेवन कुठेही कुठल्याही खासदाराने केलेलं नाही. त्याबद्दल तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात. तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याचं पुरावा सहित चोख उत्तर दिलं जाईल. हॉटेलच्या नावासहित रूम नंबर सहित सर्व देऊ शकतो, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

एल्विश यादव प्रकरणावरून निशाणा

एल्विश यादव याच्यावर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा, असं स्वतः अल्विश यादवने सांगितलं आहे. हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करतोय. त्याला कुठल्याही बाबीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत. राऊत आणि त्यांच्या ठाकरे गटाने हिंदुत्व तर सोडलेलंच आहे. परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘…तर आम्ही समर्थन करू’

एल्विश यादव जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. परंतु बळजबरी आरोपी बनवणं, हा जो काही प्रकार सुरू केलेला आहे, हे बरोबर नाही. म्हणून आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असंही शिरसाट म्हणाले.

Follow Us
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त