कळवा रुग्णालयात गोंधळ, पोलिसांशी बाचाबाची; नेमकं काय घडलं?

सैनिक नगरातील बंजारा वस्तीत राहणारा रवी सकाळी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला.

कळवा रुग्णालयात गोंधळ, पोलिसांशी बाचाबाची; नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 9:49 PM

ठाणे : ही घटना आहे मुंब्रा येथील सैनिक नगरातील. तीस वर्षीय युवक दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला. रवी चौहान असं त्याचं नाव. पोलवरील टोरंट कंपनीची विद्युत वाहिनी रस्त्यावर उघडी पडली. त्यावरून जाताच रवीचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. टोरंट कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही होते. त्यामुळे या आंदोलनाचे मोठे स्वरूप झाले. दोषींवर कारवाई करण्यात मागणी करण्यात आली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत करावे, असंही आंदोलकांचं म्हणणं होतं. सैनिक नगरातील बंजारा वस्तीत राहणारा रवी सकाळी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला. उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. टोरंट कपंनी या भागात विद्युत पुरवठा करते.

कंपनीवर नातेवाईकांचा आरोप

या टोरंट कंपनीच्या पोलवरील वायर महिन्यातून दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे उघड्यावर पडतो. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी टोरंट कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सदर तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

रुग्णालयात जोरदार आंदोलन

मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रवी चौहानच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. रवीचा मृत्यदेह कळवा येथील छ. शिवाजी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तसेच स्थानिकांनी थेट कळवा रुग्णालय गाठले. त्याठिकाणी जोरदार आंदोलन केलं.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील सहभागी होत आक्रमक झाले. या सर्वांनी रुग्णालयात ठिय्या देत दोषींवर कारवाई आणि मृताच्या नातेवाईकांना मदत देण्याची मागणी केली. यावेळी पोलिसानी संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांना आवरण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांची पोलिसांशी थोडी झटापट झाली. तात्काळ पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून स्थानिकांना पांगवले.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.