Kalyan Crime : हौसेला मोल नाही; केवळ महागड्या वस्तूंसाठी केडीएमसी कर्मचार्‍याची पत्नी बनली चोर

| Updated on: Jan 24, 2022 | 10:05 PM

महगड्या साड्या, महागडे दागिने, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची हौस होती. हीच हौस पूर्ण करण्यासाठी तिने चोरीचा मार्ग पत्करला. बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवायची आणि वेळप्रसंगी त्यांच्या पर्सला ब्लेड मारून पर्स चोरी करून पळून जायची.

Kalyan Crime : हौसेला मोल नाही; केवळ महागड्या वस्तूंसाठी केडीएमसी कर्मचार्‍याची पत्नी बनली चोर
केवळ महागड्या वस्तूंसाठी केडीएमसी कर्मचार्‍याची पत्नी बनली चोर
Follow us on

कल्याण : महागड्या साड्या आणि चांगल्या दागिन्यांची हौस भागवण्यासाठी एका संपन्न कुटुंबातील महिला कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय कल्याणात समोर आला आहे. आपली हौस पूर्ण करण्यासाठी एका केडीएमसी(KDMC) कर्मचाऱ्याची पत्नी चोऱ्या करीत असल्याची धक्कादायक बाब कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. आरती पाटील(Arti Patil) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाऊन संधी साधत ब्लेडचा वापर करत खरेदीत व्यस्त असणाऱ्या महिलांची पर्स चोरी करायची. कल्याण क्राइम ब्रांचने सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरती पाटील हिला अटक केली आहे. (The wife of a KDMC employee became a thief for fun, Arrested by Kalyan Crime Branch)

पोलीस दोन महिने या महिलेचा शोध घेत होते

कल्याण डोंबिवलीत चैन स्नॅचिंग, घरफोडी, बाईक चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. यात आणखी एक गुन्हा घडत होता. तो होता बाजारात गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स चोरी करून अज्ञात चोरटा पसार होत होता. कल्याण क्राईम ब्रांच पोलीस या चोरट्याच्या शोधात होते. कल्याण क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी भूषण दायमा, पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस कर्मचारी विनोद चन्ने, किशोर पाटील यांच्या पथकाने कल्याण डोंबिवलीतला बाजारात गर्दीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून पाहिले. एका ठिकाणी एक महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. जवळपास दोन महिने पोलीस या महिलेच्या शोधात होते. क्राइम ब्रांचचे पोलीस कर्मचारी विनोद चन्ने यांच्या गुप्त माहितीच्या आधारावर या महिलेची ओळख पटली.

अटक करण्यात आलेली महिला केडीएमसी कर्मचाऱ्याची पत्नी निघाली

सदर महिला डोंबिवलीच्या टीएमटी कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रांच पोलिसांनी या महिलेच्या घरात जाऊन तिला बेड्या ठोकल्या. या महिलेच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती ऐकून पोलीस हैराण झाले. आरतीचे पती केडीएमसीमध्ये कर्मचारी आहेत. ती एका संपन्न परिवारातील आहे. तिला चोरी करून पोट भरण्याची आवश्यकता नाही. मात्र तिला महगड्या साड्या, महागडे दागिने, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची हौस होती. हीच हौस पूर्ण करण्यासाठी तिने चोरीचा मार्ग पत्करला. बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवायची आणि वेळप्रसंगी त्यांच्या पर्सला ब्लेड मारून पर्स चोरी करून पळून जायची.

कल्याण क्राईम ब्रांचने आरतीला ताब्यात घेत कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरती सोबत तिची एक मैत्रीण पण होती जी अशाच प्रकारे चोरी करायची. शालिनी पवार नावाच्या या महिलेला सुद्धा महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. या 2 महिलांकडून आतापर्यंत 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून जवळपास 15 तोळे हस्तगत करत 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले. (The wife of a KDMC employee became a thief for fun, Arrested by Kalyan Crime Branch)

इतर बातम्या

Chandiwal Commission : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी

Delhi Crime : भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट; वाचा सविस्तर प्रकरण