Bengal Crime: पत्नीशी वाद, मुलाचा गळा चिरुन होमगार्डची आत्महत्या; सुदैवाने पत्नी बचावली

Bengal Crime: पत्नीशी वाद, मुलाचा गळा चिरुन होमगार्डची आत्महत्या; सुदैवाने पत्नी बचावली
प्रातिनिधिक फोटो

रविवारी सायंकाळी पतीसोबत वाद झाल्याचे हेमंतची पत्नी चंपा हिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी समोर सहा वर्षांचा मुलगा होता. हेमंतने धारदार शस्त्राने वार करुन मुलाची हत्या केली. चंपाला मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, चंपा कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 24, 2022 | 4:59 PM

पश्चिम बंगाल : कौटुंबिक वादातून होमगार्डने आपल्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगाल(West Bengal)मधील पुरुलियामध्ये पोलिस लाइन बेलगुमा येथे घडली आहे. हेमंत हेमब्रम उर्फ बुरु असे आत्महत्या केलेल्या होमगार्ड(Home guard)चे नाव आहे. हेमंतने पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्वतःची सुटका करुन घेत पळून जाण्यात पत्नी यशस्वी झाली. त्यामुळे ती बचावली आहे. चंपा हेमब्रम असे पत्नीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पुरुलिया पोलीस अधिक तपास करीत आहेत. हेमंत हा आधी माओवादी होता. पत्नीसह पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर दोघेही विशेष होमगार्डची नोकरी करीत होते. (Homeguard commits suicide after killing child in a family dispute in West Bengal)

माओवादी कारवायांमधून शरणागती पत्करल्यानंतर होमगार्डची नोकरीत होता

हेमंत आणि चंपा हे दोघेही नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होते. हे दोघे अर्शा येथील तानासी गावचे रहिवासी होते. एकेकाळी ते माओवाद्यांच्या अयोध्या पथकाचे सक्रिय सदस्य होते. हेमंत हा पथकातून शस्त्र घेऊन पळून गेला होता. त्यानंतर 2013 मध्ये तो पुरुलिया जिल्हा पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याची मैत्रीण चंपा हिला पोलिसांनी पकडले. आत्मसमर्पण केल्यानंतर काही वर्षांतच त्यांना विशेष गृहरक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर हेमंत आणि चंपा पुरुलियामध्ये स्थायिक झाले. दोघेही आपल्या मुलासह सामान्य जीवन जगत होते.

पतीसोबत वाद झाल्यानंतर आधी मुलाचा मग स्वतःचा गळा चिरला

नोकरी मिळाल्यानंतर हेमंत पत्नी आणि मुलांसह बेळगुमा पोलीस लाईन येथे राहत होता. रविवारी सायंकाळी पतीसोबत वाद झाल्याचे हेमंतची पत्नी चंपा हिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी समोर सहा वर्षांचा मुलगा होता. हेमंतने धारदार शस्त्राने वार करुन मुलाची हत्या केली. चंपाला मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, चंपा कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर हेमंतने स्वतःचा गळा चिरला. त्याचाही मृत्यू झाला. सोमवारी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हेमंत आणि त्याच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Homeguard commits suicide after killing child in a family dispute in West Bengal)

इतर बातम्या

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!

30 रुपयांच्या उधारीबद्दल विचारल्यानं मारलं, जखमी दुकानदाराला रुग्णालयात न्यावं लागलं! कुठं घडला प्रकार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें