AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅट्रिमोनिअल साईटवर करायचा ओळख, नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची तरुणींना धमकी, तरुणाला बेड्या

मेट्रीमोनियल साईट्वस (Matrimonial  Site) प्रोफाईल बनवून मुलींनी जाळ्यात फसवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण तरुणींशी ओळख करुन त्यांचे फोटो आणि अश्लील व्हिडीओ (Womens Video) क्लीप तयार करायचा.

मॅट्रिमोनिअल साईटवर करायचा ओळख, नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची तरुणींना धमकी, तरुणाला बेड्या
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 2:18 PM
Share

नवी दिल्ली : मेट्रिमोनियल साईट्सवर (Matrimonial  Site) प्रोफाईल बनवून मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण तरुणींशी ओळख करुन त्यांच्या फोटो आणि अश्लील व्हिडीओ (Womens Video) क्लीप तयार करायचा. तसेच नंतर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देत तरुणींकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी त्याला अटक केले असून त्याने कित्येक तरुणींना फसवले असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.

तरुणीशी ओळख करुन रेकॉर्ड केला अश्लील व्हिडीओ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव साहिल असून तो उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेक तसेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्याच्या मोबाईल फोनमध्ये तरुणींचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे एका तरुणीने तक्रार केली होती. या तरुणीने काही महिन्यांपूर्वी लग्नासाठी मेट्रोमोनियल साईटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये तरुणीची आरोपी साहिलोसोबत ओळख झाली. त्यांचं वेळोवेळी बोलणं होऊ लागलं. आरोपीने नंतर तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही दिवसांनी ते व्हिडीओ कॉलवरदेखील बोलत होते. याच काळात आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो देऊ लागला. धमकीचे हे सत्र इथपर्यंतच थांबले नाही, तर आरोपी तरुणीकडून पैशांची मागणी करत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने आरोपी साहिलविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर त्याचा भंडाफोड करण्यात आला.

अनेक मुलींना केलं ब्लॅकमेल

पोलिसांनी दाखल तक्रारीनुसार तपास सुरु केला असता आरोपी साहिलने यापूर्वीदेखील अनेक तरुणींना फसवलं असल्याचं समोर आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी त्याच्या अकाऊंटमध्ये काही पैसे ट्रान्सफर केले. तसेच त्याच्या लोकेशननुसार पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी हालचाल सुरु केली. मात्र शंका आल्यामुळे तो सतत आपली जागा बदलत होता. पोलिसांनी त्याला अखेर साऊथ दिल्ली या भागातून अटक केलं. मागील अनेक दिवसांपासून साहिल नोकरीच्या शोधात होता, पुढे याच कळात त्याने दिल्ली, भोपाळ, गाझियाबाद येथील तरुणींना फसवलं, असं साहिलने सांगितलं आहे.

इतर बातम्या :

‘सुर्वे, ठोबरेंच्या नादी लागतो काय’ असं म्हणत मुळशी तालुक्यात उपसंरपंचावर हल्ला, गाडीचीही तोडफोड

Crime | पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ

‘होय, सागरचा खून प्रेमप्रकरणातूनच!’ अडीच महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा, तलावात बुडण्याआधी सागरसोबत काय झालं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.