Crime | पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ

Crime | पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ
प्रातिनिधीक फोटो

पत्नीवर (Wife) वाकडी नजर टाकल्याने एका माणसाने आपल्याच मित्राची (Friend Murder) गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. या घटनेमुळे कानपूर हादरून गेले असून पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 24, 2022 | 12:28 PM

कानपूर : पत्नीवर (Wife) वाकडी नजर टाकल्याने एका माणसाने आपल्याच मित्राची (Friend Murder) गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. या घटनेमुळे कानपूर हादरून गेले असून पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे. भैरोघाट येथे ही घटना घडली. विपिन निगम असे अरोपीचे तर सुनिल सिंह असे मृत माणसाचे नाव आहे. दोघेही चांगले मित्र होते. मात्र पत्नीबद्दल सतत घाणेरडे वाक्य बोलणे तसेच वाईट नजर टाकल्यामुले विपिनने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

पत्नीवर वाकडी नजर टाकायचा 

मिळालेल्या माहितुसार विपिन निगम याच्या घरी पिशव्या तयार करण्याचा कारखाना आहे. तो कानपूरमधील जुही येथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी शुभम सिंह नावाचा व्यक्ती काम करतो. तर मूळचे आंबेडकरनगरमधील बसैहा येथील सुनिल सिंह हे शुभमचे मामा आहेत. सुनिल सिंह हे शुभम सिंह याला नेहमी भेटायला यायचे. याच काळात सुनिल आणि विपिन यांच्यात मैत्री झाली. नंतर हे दोघेही सोबत दारु प्यायला जायचे. मात्र सुनिल विपिनच्या पत्नीवर सतत घाणेरड्या कमेंट्स करायचा. तसेच त्याच्या पत्नीवर वाकडी नजर टाकायचा. याबाबत विपिनने सुनिल याला समज दिली होती. पण तो ऐकायला तयार नव्हता.

सोबत दारू पिली, नंतर हत्या 

शनिवारी सुनिल सिंह नेहमीप्रमाणे विपिनच्या घरी गेला. येथे दोघांनीही सोबत दारू पिली. याच वेळी सुनिलने विपिनच्या पत्नीबद्दल घाणेरडे बोलणे सुरु केले. त्यानंतर दोघांमध्येही वाद झाले, मात्र सुनिलने त्याचे ऐकले नाही. रागात आलेल्या विपिनने नंतर देवदर्शन घेण्याच्या बहाण्याने सुनिलला घाटावर नेले. येथेच रविवारी पहाटे 3.30 वाजता विपिनने सुनिलवर गोळी झाडली. या हल्ल्यात सुनिलचा जागेवरच मृत्यू झाला.

दोघांमध्ये सुरु होता वेगळाच वाद ?

दरम्यान, घाटावरच भल्या पहाटे हत्या झाल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. घाटावरील पूजाऱ्यांनी विपिनला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत मृताच्या कुटुंबीयांनी वेगळाच आरोप केला आहे. दोघांमध्ये एक प्रॉपर्टी विकून मिळणाऱ्या कमिशनबाबत वाद सुरु होता. त्यामुळे ही हत्या झाली, असे मृताच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

इतर बातम्या :

‘होय, सागरचा खून प्रेमप्रकरणातूनच!’ अडीच महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा, तलावात बुडण्याआधी सागरसोबत काय झालं?

करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें