AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Crime : भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट; वाचा सविस्तर प्रकरण

वृद्ध महिलेने सांगितले की, संपत्तीच्या वादातून 13 जानेवारी रोजी तिच्या नातवाने कुत्र्याकडून तिच्यावर हल्ला करवला. यावेळी कुत्र्याने महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. याप्रकरणी महिलेने DCW च्या 181 महिला हेल्पलाइनवर 20 जानेवारी 2022 रोजी कॉल केला आणि तक्रार केली.

Delhi Crime : भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट; वाचा सविस्तर प्रकरण
भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 6:32 PM
Share

नवी दिल्ली : संपत्तीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. याचेच उदाहरण म्हणून दिल्लीत एक मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. संपत्ती(Property)च्या वादातून चिडलेल्या नातवा(Grandson)ने चक्क आपल्या आजी(Grandmother)ला लचके तोडण्यासाठी कुत्र्यांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील ईस्ट नगर भागात घडली आहे. यामध्ये आजी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी कल्याणपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नातवाविरोधात कमल 289 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना नोटीस बजावून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यास सांगितले आहे. (In Delhi, a grandson attacked her grandmother with a dog for property)

संपत्तीसाठी मुलगा आणि नातवाकडून महिलेचा वारंवार छळ

आत तकने दिलेल्या माहितीनुसार, पीडित 70 वर्षीय महिला दिल्लीतील विनोद नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. महिलेचा मुलगा आणि नातू संपत्तीसाठी नेहमीच या महिलेचा छळ करतात. सहा महिन्यांपूर्वी आरोपी नातवाने घरी कुत्रा आणला होता. मात्र आजी वारंवार नातवाला हा कुत्रा धोकादायक आहे, त्याला घरी ठेवू नको असे सांगत होती. तरीही नातवाने कुत्रा घरात ठेवून घेतला.

नातवाने कुत्रा अंगावर सोडला, महिला गंभीर जखमी

वृद्ध महिलेने सांगितले की, संपत्तीच्या वादातून 13 जानेवारी रोजी तिच्या नातवाने कुत्र्याकडून तिच्यावर हल्ला करवला. यावेळी कुत्र्याने महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. याप्रकरणी महिलेने DCW च्या 181 महिला हेल्पलाइनवर 20 जानेवारी 2022 रोजी कॉल केला आणि तक्रार केली. यावर महिला आयोगाच्या पथकाने महिलेच्या घरी पोहोचून प्रकरणाचा आढावा घेतला. आपल्या जीवाला धोका असल्याचे महिलेने या पथकाला सांगितले. आयोगाच्या पथकाने महिलेला कल्याणपुरी पोलिस ठाण्यात नेले आणि तेथे कलम 289 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस देऊन उत्तर मागितले

महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस देऊन माहिती मागवली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे का, अशी विचारणा आयोगाने दिल्ली पोलिसांना केली आहे. नसेल तर कारण द्या. याशिवाय वृद्ध महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली आहेत. आयोगाने याप्रकरणी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवालही मागवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती 31 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे. (In Delhi, a grandson attacked her grandmother with a dog for property)

इतर बातम्या

Bengal Crime: पत्नीशी वाद, मुलाचा गळा चिरुन होमगार्डची आत्महत्या; सुदैवाने पत्नी बचावली

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.