AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टनरशी पटेना, धंदा वेगळा केला; लाखांचा ऐवज लुटला, डोंबिवलीतील 13 लाखाच्या चोरीचा उलगडा

डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई कलेक्शन नावाचे गिफ्ट शॉप आहे. सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे हे दोघे या दुकानाचे पार्टनर आहेत. गेल्या काही दिवसापासून आंग्रे आणि वनारसे यांच्यात सतत कुरबुरी सुरु होत्या.

पार्टनरशी पटेना, धंदा वेगळा केला; लाखांचा ऐवज लुटला, डोंबिवलीतील 13 लाखाच्या चोरीचा उलगडा
पार्टनरशी पटेना, धंदा वेगळा केला; लाखांचा ऐवज लुटला
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 03, 2021 | 6:38 PM
Share

डोंबिवली : पार्टनरसोबत काही दिवसांपासून पटत नसल्याने गिफ्ट शॉपच्या मालकाने स्वतःचे वेगळे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. यात दुकानात ठेवण्यासाठी त्याने पार्टनरशीपमध्ये असलेल्या दुकानातून लाखोंचा ऐवज लुटला. पोलिसांनी खाक्या दाखवताच 13 लाखाच्या चोरीचा तिढा सुटला. विष्णुनगर पोलिसांना गिफ्ट शॉपमधील 13 लाखाच्या चोरीचा छडा लावण्यास यश आले असून आरोपीला अटक केली आहे.

डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई कलेक्शन नावाचे गिफ्ट शॉप आहे. सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे हे दोघे या दुकानाचे पार्टनर आहेत. गेल्या काही दिवसापासून आंग्रे आणि वनारसे यांच्यात सतत कुरबुरी सुरु होत्या. त्यामुळे अजिंक्य वनारसे याने दिव्यात स्वतःचे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दुकानात ठेवण्यासाठी वनारसे वस्तू पाहिजे होत्या. मात्र आर्थिक कुवत नसल्याने त्याने पार्टनरशीपमध्ये रुई कलेक्शन दुकानातून वस्तू चोरण्याचे ठरवले आणि आपली ही योजना अंमलातही आणली.

मंगळवारी दुकान उघडताच चोरीची घटना उघडकीस

रुई कलेक्शनचे दुसरे पार्टनर सुशांत आंग्रे यांनी मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडताच समोरील नजारा पाहून सुशांतला धक्का बसला. दिवाळीनिमित्त दुकानात लाखो रुपयांचा माल भरण्यात आला होता. मात्र मंगळवारी दुकान उघडले तेव्हा यातील लाखोंचा माल गायब होता. दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच दुकानाचे मालक सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे यांनी तात्काळ विष्णुनगर पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाला भेट देत घटनास्थळाची पाहणी करीत चोरीचा तपास सुरु केला.

पोलिसी खाक्या दाखवताच मालकानेच चोरी केल्याचे उघड

तपासादरम्यान पोलिसांना दुकानाचा पार्टनर अजिंक्य वनारसे याचे वागणे संशयास्पद वाटले. त्यानुसार पोलीस अधिकारी गणेश वदने यांनी वनारसे याच्याकडे या प्रकरणाची चौकशी सुरु केली. मात्र तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच वनारसेने सर्व घटना पोलिसांसमोर कथन केली. पार्टनर सुशांत आंग्रेशी पटत नसल्याने स्वतःचे वेगळे दुकान सुरु केले. या दुकानात ठेवण्यासाठी या वस्तू चोरल्याच कबुली वनारसेने दिली. यानंतर पोलिसांनी अजिंक्य वनारसेला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मालही हस्तगत केला आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. (Theft of Rs 13 lakh from shop partner in Dombivali)

इतर बातम्या

नागपूरात बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक, 17 गाड्या जप्त, मौज मस्तीसाठी करायचा चोरी

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत