AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरात बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक, 17 गाड्या जप्त, मौज मस्तीसाठी करायचा चोरी

बाईक चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी मानकापूर पोलिसांच्या हाती लागला त्याची चौकशी करतातच एक दोन नाही तर चक्क 17 बाईक त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या.

नागपूरात बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक, 17 गाड्या जप्त, मौज मस्तीसाठी करायचा चोरी
नागपूरात 17 बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 4:03 PM
Share

नागपूर : वेगवेगळे कपडे बदलून बाईक चोरी करणाऱ्या एका बाईक चोराला नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोराकडून चोरी केलेल्या 17 बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बाईक चोरी करायला जायच्या आधी तो कपडे बदलायचा एक चोरी एक ड्रेस अस त्याचं तत्व आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत होती. त्यावरून पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रित केलं आणि या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र याची पद्धत पाहून पोलिसही आवाक झाले. (Criminal thief arrested for stealing 17 bikes in Nagpur)

बाईक चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी मानकापूर पोलिसांच्या हाती लागला त्याची चौकशी करतातच एक दोन नाही तर चक्क 17 बाईक त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या. त्याची चोरी करण्याची पद्धत मात्र इतर चोरांच्या तुलनेत निराळी आहे. तो जेव्हा बाईक चोरी करायला निघतो तेव्हा कपडे बदलतो, एक चोरी झाली की ड्रेस बदलून तो दुसऱ्या चोरीसाठी निघतो. बाईक चोरी केली की तो त्याचा पार्टनर असलेल्या गॅरेज वाल्याकडे जातो. ते दोघे लगेच त्या गाडीचे पार्ट काढतात आणि दुसऱ्या गाड्यांना लावून त्याची विक्री करतात. आतापर्यंत 17 चोरीच्या घटनांचा उलघडा झाला असला तरी आणखी काही गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या

औरंगाबादेत दिवाळीच्या सुरुवातीलाच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. शहरात एकाच रात्रीतून शहरातील विविध भागात चार घरे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी दोन घरफोड्या एमआयडीसी सिडको (MIDC CIDCO) आणि छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या (Mukundwadi Police Station) हद्दीत दोन चोऱ्या झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांत झाली आहे.

नागपूरात कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या

दारुड्यांसोबत झालेल्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. फ्रॅंक भूषण अँथोनी असे मयत गुंडाचे नाव आहे. दारुड्यांमध्ये सुरु असलेला वाद पाहत असल्याच्या कारणावरुन फ्रँक आणि दारुड्यांमध्ये वाद झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून संगनमत करून याची धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली. फ्रँक अँथोनी हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगर भागात राहतो. रात्री तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी खोब्रागडे चौकात पाच दारुड्यांमध्ये वाद सुरू होता. फ्रँक तिथे उभा राहून वाद बघत असताना भांडण करत असलेल्या एकाने त्याला काय बघतोय बे…. असं म्हटल्यानंतर फ्रँक अण्णा चिडला. त्यानंतर फ्रँक अण्णा आणि त्या पाच आरोपींमध्ये वाद सुरू झाला. (Criminal thief arrested for stealing 17 bikes in Nagpur)

इतर बातम्या

फेसबुकवरील मैत्री महागात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

सावधान! औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या, घर,दुकान,ऑफिसमध्ये लूट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.