TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 22 ते 24 मधील विजयी उमेदवार कोण?

Thane Municipal Corporation TMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक बावीस, तेवीस आणि चोविसमध्ये कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 22 ते 24 मधील विजयी उमेदवार कोण?
ठाणे महापालिका
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2026 | 5:00 PM

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कौलनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 43.96 टक्के मतदान झालं होतं. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग असून 131 जागा आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेनं 87 जागा लढवल्या असून भाजपने 40 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर उर्वरित चार जागा लहान मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने 53 जागा, मनसे 34 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 36 जागा लढविल्या आहेत.

ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.

Ward No. 22

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 22 मधील चार जागांपैकी दोन जागांवर भाजपने आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 22 हा रामकृष्ण नगर, हाजुरी, रायलादेवी तलाव असा असा विस्तारीत आहे. प्रभाग क्रमांक 22 ची एकूण लोकसंख्या 54391 इतकी आहे. त्यापैकी 6215 एवढी अनुसूचित जातीची तर 1091 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चार जागांपैकी दोन जागांवर भाजपने आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक बावीस अ मधून भाजपचे सुनिल हांडोरे विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 22 ब मधून भाजपच्याच नम्रता कोळी या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्या पल्लवी कदम यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे सुधीर कोकाटे हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
22 (अ)
22 (ब)
22 (क)
22 (ड)

Ward No. 23

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 23 मधील चारपैकी चार जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये शहापूर, शहापूर गाव, कोलशेत, ठाणे गाव, घोडबंदर रोडच्या काही भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 23 ची एकूण लोकसंख्या 61742 इतकी आहे. त्यापैकी 4416 एवढी अनुसूचित जातीची तर 808 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चार जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक तेवीस अ मधून काँग्रेसचे मिलिंद पाटील विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 23 ब मधून काँग्रेसच्या अपर्णा साळवी या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसच्याच प्रमिला केणी यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे मुकुंद केणी हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
23 (अ)
23 (ब)
23 (क)
23 (ड)

Ward No. 24

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 24 मधील चारपैकी दोन जागांवर काँग्रेसनं आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये श्री नगर, शांती नगर, राम नगर यात प्रामुख्याने वाल्मिकी मंदीर, मुकेश प्रल्हाद धिंग्रा हाऊस, बारी मेटल फिनिशर्स, राव इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, आरबीआय निशिगंधा सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी परिसर येतात. प्रभाग क्रमांक 24 ची एकूण लोकसंख्या 61742 इतकी आहे. त्यापैकी 6196 एवढी अनुसूचित जातीची तर 2892 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

ठाणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह


2017 मध्ये या प्रभागात चारपैकी दोन जागांवर काँग्रेसनं आणि दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चोवीस अ मधून काँग्रेसच्या आरती गायकवाड विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 24 ब मधून शिवसेनेच्या प्रियांका पाटील या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेच्या पूजा करसुळे विजयी झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
24 (अ)
24 (ब)
24 (क)
24 (ड)

 

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

ठाणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us