
TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कौलनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 43.96 टक्के मतदान झालं होतं. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग असून 131 जागा आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेनं 87 जागा लढवल्या असून भाजपने 40 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर उर्वरित चार जागा लहान मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने 53 जागा, मनसे 34 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 36 जागा लढविल्या आहेत.
ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.
प्रभाग क्रमांक 28 मध्ये गेल्या वेळी चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50508 इतकी आहे. त्यापैकी 4750 एवढी अनुसूचित जातीची तर 438 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक अठ्ठावीस अ मधून शिवसेनेचे दीपक जाधव विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 28 ब मधून शिवसेनेच्या दर्शना म्हात्रे या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्या सुनिता मुंडे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रेसचे रमाकांत मढवी विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 28 (अ) | ||
| 28 (ब) | ||
| 28 (क) | ||
| 28 (ड) |
प्रभाग क्रमांक 29 मध्ये गेल्या वेळी तीनपैकी तीन जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. साधारणपणे या प्रभागात वागळे इस्टेट, जयहिंद कॉलनी, टिळक नगर यांसारख्या भागांचा समावेश असू शकतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 38172 इतकी आहे. त्यापैकी 1845 एवढी अनुसूचित जातीची तर 991 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात तीनपैकी तीन जागांवर काँग्रेसनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक एकोणतीस अ मधून काँग्रेसचे बाबाजी पाटील विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 29 ब मधून काँग्रेसच्या नादिरा सुरमे या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसच्याच सुलोचना पाटील यांनी बाजी मारली होती.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 29 (अ) | ||
| 29 (ब) | ||
| 29 (क) |
प्रभाग क्रमांक 30 मध्ये गेल्या वेळी चारपैकी चारही जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60105 इतकी आहे. त्यापैकी 35 एवढी अनुसूचित जातीची तर 112 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चार जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक तीस अ मधून काँग्रेसच्या हसीना शेख विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 30 ब मधून काँग्रेसच्या हफिजा नाईक या विजयी झाल्या होत्या. क मधून काँग्रेसच्याच झफरन्नोमानी यांनी बाजी मारली होती. तर ड मधून काँग्रसचे सिराजअहमद डोंगरे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 30 (अ) | ||
| 30 (ब) | ||
| 30 (क) | ||
| 30 (ड) |
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE