Eknath Shinde : वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काय हरकत नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच

| Updated on: Feb 12, 2022 | 7:03 PM

क्रिकेट सामन्यांचे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र ग्रामीण भागातही चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Eknath Shinde : वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काय हरकत नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच
ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयासाठी जमीन देण्याची मागणी शासनाकडून मान्य
Follow us on

ठाणे : महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काही हरकत नाही असे विधान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केडीएमसी निवडणुकीत आघाडीसाठी आम्ही तयार आहोत असे विधान केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीची संकेत मिळत आहे. मात्र काँग्रेसची भूमिका काय आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. श्री मलंगगड क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी मलंग गड पट्ट्यात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नगरसविकास मंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त राजकीय संकेत दिले आहे. (Urban Development Minister Eknath Shinde’s political hints about the upcoming municipal elections)

क्रिकेट सामन्यांचे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र ग्रामीण भागातही चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या क्रिकेट सामन्यात 41 वर्ष वयोगटाच्या आत असलेल्या खेळाडूंचे 48 संघ सहभागी झाले आहेत. तर 40 वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचे 10 क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

कल्याणमधील 7 ते 8 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

माझ्यासह कल्याणमधील आणखी 7 ते 8 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा दावा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केला आहे. पाटील यांच्या या दाव्यामुळे कोणत्या पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. कल्याणमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्याला अपक्ष नगरसेवक कुणाल पाटीलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. 2015 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुणाल पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आज राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात कुणाल पाटील हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित राहिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Urban Development Minister Eknath Shinde’s political hints about the upcoming municipal elections)

इतर बातम्या

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

Video : नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची; आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणावरुन अमरावतीत जोरदार राजकारण