या महापालिकेत भाजपचे सर्व चाणक्य फेल… भाजप, शिंदे गट आणि अजितदादांना भोपळा; स्थानिक आघाडीची 115 पैकी 113 जागांवर आघाडी; मोठा दणका

Vasai Virar Municipal Corporation Election Results 2026: या महापालिकेने महायुतीला जबरी धक्का दिला आहे. वसई-विरार महापालिकेत भाजपचे सर्व चाणक्य फेल ठरले आहेत. याठिकाणी सकाळच्या कलांमध्ये भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांना भोपळा फोडता आला नाही.

या महापालिकेत भाजपचे सर्व चाणक्य फेल... भाजप, शिंदे गट आणि अजितदादांना भोपळा; स्थानिक आघाडीची 115 पैकी 113 जागांवर आघाडी; मोठा दणका
प्रारंभिच्या फेऱ्यात चाणक्य फेल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 16, 2026 | 2:57 PM

Hitendra Thakur Bahujan Vikas Aaghadi : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हे धुरंधर ठरले आहेत. या महापालिकेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपचे चाणक्य फेल ठरले आहे. त्यांचे अंदाज सुरुवातीच्या कौलमध्ये सफशेल फसल्याचे दिसून येते. भाजप, शिंदेसेना आणि अजितदांना सुरुवातीला अजून भोपळा सुद्धा फोडता आले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे यापूर्वी तीन आमदारांचा पराभव झाल्यानंतर स्थानिक निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांची जादू ओसरली नसल्याचे दिसून येते.

वसई-विरारमध्ये शिट्टी वाजणार?

Live

Municipal Election 2026

05:25 PM

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नंबर 2 चा पक्ष..

05:11 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : माझ्या पोरानं ठाकरेंची इज्जत काढली, सोमय्या यांची थेट टिका...

05:03 PM

मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 48 मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक इलियास शेख आघाडीवर

04:01 PM

Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका

04:44 PM

पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत

04:27 PM

हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला

वसई-विरार महानगरपालिकेत मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये बहुजन विकास आघाडीने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. वसई-विरारमधील सर्व प्रभागांमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट आघाडी दिसून येत आहे. सर्वच प्रभागांमध्ये शिट्टी वाजणार की काय अशी चर्चा रंगली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाने मजबूत पकड मिळवल्याचे दिसून येत आहे. 2010 मध्ये वसई-विरार महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा एक हाती झेंडा आहे. सध्याच्या प्रारंभिक फेऱ्यांमध्ये बविआचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे.

भाजपच्या विजयी अभियानाला ब्रेक

राज्यात भाजपचे अनेक महानगरापालिकांमध्ये विजयी अभियान सुरू आहे. अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. काही ठिकाणी तर भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. दरम्यान मुंबईत भाजपने मोठी आघाडी घेतली असताना वसई-विरारमध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला अद्यापही मोठी कामगिरी बजावता आलेली नाही. भाजपच्या विजयी अभियानाला इथं ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. तर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे आणि फटाके सोबत आणले आहे. पुढील काही फेऱ्यांमध्ये या महापालिकेतील चित्र अजून स्पष्ट होईल. त्यानंतर इथं आतषबाजी होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बहुजन विकास आघाडी आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होते का याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे. अजून काही फेऱ्यानंतर भाजप, शिंदे सेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला खातं उघडता येतं का, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागले आहे.  पण सध्या तरी या महानगरपालिकेच्या निकालातून बहुजन विकास आघाडीने मोठी मुसंडी मारल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे मानले जात आहे.