AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रहार नंतर बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार? रवींद्र फाटकांची मोठी प्रतिक्रिया, काय दिले संकेत?

Ravindra Pathak on Bahujan Vikas Aghadi : प्रहारनंतर शिंदेंच्या शिवसेनेची भूक वाढली आहे का? वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार का? रवींद्र फटकांची थेट मोठी प्रतिक्रिया काय? काय दिले संकेत?

प्रहार नंतर बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार? रवींद्र फाटकांची मोठी प्रतिक्रिया, काय दिले संकेत?
हितेंद्र ठाकूर, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 26, 2026 | 1:27 PM
Share

Ravindra Pathak on Bahujan Vikas Aghadi: राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुत्सेद्दीगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच एक मोठी घडामोड समोर येत आहे. प्रहारनंतर शिंदेच्या शिवसेनेची भूक वाढली आहे का? असा सवाल विचारल्या जात आहे. बच्चू कडू हे प्रहारसह शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्यावर विदर्भात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. तर मुंबई जवळच्या परिसरातही शिवसेना मजबूत करण्यासाठी शिंदेंनी कंबर कसल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याची खेळली जाऊ शकते. इतकेच नाही तर हितेंद्र ठाकूर यांचा हा पक्ष शिवसेनेत विलीन होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. अर्थात या जर-तरच्या चर्चा आहेत. या सर्व घडमोडीतील महत्त्वाचा दुवा मानले जाणारे शिवसेना नेते रवींद्र फाटक यांनी मोठा खुलासा केला आहे.

बहुजन विकास आघाडी सेनेत विलीन होणार?

बहुजन विकास आघाडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार का याविषयी शिवसेना नेते रवींद्र फटाक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे महापालिका निवडणुकीवेळी वसई विरार आणि पालघरची जबाबदारी होती. मी पालघर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामागे कोणताही राजकीय अर्थ लावू नये. विलीनीकरण हा मोठा विषय असल्याने त्याबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदेच बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया रविंद्र फाटक यांनी दिली आहे.

आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

आज मुंबईत मोठ्या घाडमोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे कळते. या भेटीत ऑपरेशन टायगर आणि विधान परिषद जागा वाटपासंबंधी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान जागा वाटपाचे त्रांगडे सोडवण्यासाठी आज महायुतीची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला हजर असतील. जागा वाटपात अधिक जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना दबावतंत्राचा वापर करत असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने 17 जागांपैकी 7 जागांवर दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

दिल्लीत NDA च्या नेत्यांना भेटलो त्यात गैर काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. रविवारी अमित शहांसोबत त्यांची गुप्त बैठक झाली. बैठकीत विधान परिषदेच्या जागांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत इतरही राज्यात पक्ष संघटना वाढवण्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत NDA च्या नेत्यांना भेटलो त्यात गैर काय? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. दिल्लातील नेत्यांना भेटणारच असे एकनाथ शिंदे ऑफ द रेकॉर्ड बोलल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक