मोठी बातमी ! पालघरमध्ये वर्षभरानंतर कोरोनामुळे पहिला मृत्यू, व्हेंटिलेटरमुळे घात?; नातेवाईकांचे गंभीर आरोप काय?

पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसे न् दिवस वाढ होत आहे. कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात उपचार गेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. पण तिला ऑक्सिजन पुरवठा न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

मोठी बातमी ! पालघरमध्ये वर्षभरानंतर कोरोनामुळे पहिला मृत्यू, व्हेंटिलेटरमुळे घात?; नातेवाईकांचे गंभीर आरोप काय?
coronaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 12:59 PM

पालघर : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यात उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असतानाच पालघरमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. वर्षभरानंतरचा कोरोनाचा हा पहिला बळी आहे. रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने तिचे निधन झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरणार असल्याचे दिसत आहे. असं असतानाच व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याने आरोग्य विभाग कोरोना बाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईला नेण्याआधीच मृत्यू

बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात परिसरातील वाळवा या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथेही त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना तिचा त्रास वाढू लागला. परिणामी या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला ही खूप गंभीर अवस्थेत असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश बोदाडे ह्यानी सांगितले.

तसेच रुग्णालयाने वेळेत व्हेंटिलेटर लावले असते तर महिलेचा जीव वाचला असता, असं या महिलेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सध्या पालघर शहरातील ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेल्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

98 रुग्णांवर उपचार सुरू

सध्या पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या  98 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णांवर उपचार सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी 7 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 5 रुग्ण आढळून येत होते. तर या आठवड्यात ग्रामीण भागात एक तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 8 असे एकूण 9 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण संख्या पालघर तालुक्यात असून ही संख्या 37 आहे. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात चार, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत 44 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोना बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील ही संख्या 65 झाली आहे.

Non Stop LIVE Update
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ.
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.