Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात अनिल रामू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळून आला. अनिल रामू चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या विहिरीत हे मृतदेह पाहिल्यानंतर त्याने ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले.

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट
चाळीसगावमध्ये दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यूदेह विहिरीत आढळला
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 01, 2022 | 12:36 AM

चाळीसगाव / खेमचंद कुमावत (प्रतिनिधी) : चाळीसगावातील रांजणगाव शिवारामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. दोन लहान चिमुकल्यांसह आईचा मृतदेह (Deadbody) विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. इला मनोज पावरा (25) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, ही आत्महत्या (Suicide) आहे की हत्या (Murder) याबाबत संभ्रम आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे पावरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिघांच्याही मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट

जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात अनिल रामू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळून आला. अनिल रामू चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या विहिरीत हे मृतदेह पाहिल्यानंतर त्याने ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठवले. या मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. मयत महिलेचे कुटुंब हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवागढमध्ये येथील आहे. गेल्या चार वर्षापासून हे कुटुंब रांजणगाव येथील शेतकरी बापूराव गिरधर चौधरी यांच्या शेतात सालाने काम करत होते. या संपूर्ण घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही आत्महत्या की अपघात की आणखी दुसरंच काही हे अजूनही कळू शकलेले नाही. या तिघांच्याही मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (The body of a mother with two children was found in a well in Chalisgaon)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें