AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?
Supriya SuleImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 12:55 PM
Share

सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले. हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे, आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या त्या अमान्य आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर झाला, ज्या पद्धतीने त्या यंत्रणेचा गैरवापर झाला ते लोकशाहीसाठी घातक आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  शिवसेना ही काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. त्याच कारण असं की बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला, त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, आणि समजा एखाद्याचं काही वेगळ मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली, त्या पद्धतीने त्यांनी करायला हवं होतं, त्यांना कोणी अडवलं होतं. स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणं ही कौतुकाची गोष्ट आहे.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर आहेत, आणि राष्ट्रवादीचं जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचं मतदान नाही. पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, तो कालही होता, आजही होता आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण आम्हाला अशा संस्थावर टीका करायला आवडत नाही. परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षावर अन्याय केला का? तर केला, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत