AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI कडून रद्द, ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

याआधी एप्रिल महिन्यातच केंद्रीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला होता. आयबीआयने म्हटले होते की बँकने आपल्या परवान्या संबंधित आवश्यक नियमांचे पालन केलेले नाही.

मोठी बातमी! महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI कडून रद्द, ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
rbi news
| Updated on: May 12, 2026 | 11:02 PM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे बँक परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रिय बँकने मंगळवारी सांगितले की ही कारवाई बँकेची कमजोर आर्थिक स्थिती, अपुरी जमापूंजी आणि भविष्यातील कामगिरी खराब होण्याची शक्यता असल्याने केली आहे. हा निर्णय १२ मे रोजी कामकाज संपल्यानंतर तात्काळ लागू करण्यात आलेला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवदेन जाहीर केले असून त्यात ही मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकींग रेग्युलेशन एक्टच्या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. सध्याची बँकेची स्थितीत तिचे संचलन जारी ठेवणे खातेदारांच्या हिताचे नाही. लायसन्स रद्द झाल्यानंतर बँकने लागलीच तात्काळ प्रभावाने सर्व बँकींग सेवा बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. ज्यात ग्राहकांकडून जमा रक्कम स्वीकारणे आणि ग्राहकांना पैसे देणे अशा दोन्हींचा समावेश करण्यात आला आहे.

या खातेदारांचे पैसे मिळणार

आरबीआयने महाराष्ट्र सहकारी समितीच्या रजिस्ट्रारना बँकेला बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यास आणि एका लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. लिक्विडेटर बँकेची संपत्ती आणि देणीदारांचा निपटारा करेल. केंद्रिय बँकेच्या मते सध्या आर्थिक स्थिती बँक आपल्या जमाकर्त्या खातेधारकांना पैसे परत करण्याच्या स्थितीत नाही. मात्र, ज्या खातेधारकांची जमा रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांचे पैसे डिपॉझिट इंश्योरन्स एण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) अंतर्गत परत मिळणार आहेत.

26.72 कोटींची रक्कम आधीच दिली

आरबीआयने सांगितले की बँकेचे सुमारे 98.36 टक्के जमाकर्ते असे आहेत, ज्यांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत त्यांची संपूर्ण जमा रक्कम पुन्हा परत मिळेल. 31 मार्च 2026 पर्यंत डीआयसीजीसी बँकेच्या ग्राहकांना विमा असलेले जमा पैशांच्या रुपात सुमारे 26.72 कोटींची रक्कम आधीच दिलेली आहे. अलिकडील वर्षात आरबीआय आर्थिक रुपयाने कमजोर शहरी सहकारी बँकांविरोधात सतत कारवाई करत आहे. केंद्रीय बँकांचा फोकस जमाकर्त्यांच्या हितांचे संरक्षण आणि बँकांचे कामकाज सुरळीत करणे आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?