Pune : संभाजी ब्रिगेडचे ‘ग्रेट वर्क’, तिरंग्याचा अवमान होऊ नये म्हणून झेंडे काढण्याचा निर्णय

| Updated on: Aug 13, 2022 | 11:28 PM

हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमातून राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण व्हावे अशी या मागची भावना असली तरी महापालिकेने वाटप केलेले झेंडे हे चुकीच्या पद्धतीने छापण्यात आले आहेत. शिवाय आजपासून या उपक्रमाला सुरवात झाली असून शहरातील विविध भागात असेच झेंड लावण्यात आले आहेत. उपक्रम चांगला असला तरी यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.

Pune : संभाजी ब्रिगेडचे ग्रेट वर्क, तिरंग्याचा अवमान होऊ नये म्हणून झेंडे काढण्याचा निर्णय
राष्ट्रध्वज
Follow us on

पुणे : केवळ शासकीय कार्यालयामध्येच ध्वजारोहणाचा कार्यक्रम न होता अमृत महोत्सवानिमित्त (Har Ghar Tiranga) हर घर तिरंगा असा अभिनव उपक्रम यंदा सबंध देशात राबवला जात आहे. त्याला शनिवारपासूनच सुरवात झाली आहे. असे असले तरी पुण्यात रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला गेटवर लावलेले झेंडे (Sambhaji Briged) संभाजी ब्रिगेडनं काढण्यास सुरवात केली आहे. (Pune Municipal) महापालिकेच्यावतीने देण्यात आलेले झेंडे हे चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत. झेंड्यामध्ये रंग वेगवेगळे आहेत तर मधोमध असलेले अशोक चक्रही तिरपे झाले आहे. हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याने अस्ताव्यस्त ठिकाणचे झेंडे काढण्यास संभाजी ब्रिगेडने पुण्यात सुरवात केली आहे. शिवाय राष्ट्रध्वजाचा अवमान करु नका असे म्हणत जिथे चुकीच्या पद्धतीने झेंड लावण्यात आले ते इतरांनीही काढावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महापालिका अन् पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार

हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमातून राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण व्हावे अशी या मागची भावना असली तरी महापालिकेने वाटप केलेले झेंडे हे चुकीच्या पद्धतीने छापण्यात आले आहेत. शिवाय आजपासून या उपक्रमाला सुरवात झाली असून शहरातील विविध भागात असेच झेंड लावण्यात आले आहेत. उपक्रम चांगला असला तरी यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका संभाजी ब्रिगेडनं महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे. शिवाय शहरात असे झेंडे लावण्यात आले असले तरी ते काढून घेण्याचेही आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे.

नेमक्या काय आहेत चुका?

यंदा तीन दिवस 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण साजरा होत आहे. हर घर तिरंगा या संकल्पनेतून राष्ट्रप्रेम व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गावस्तरावर ग्रामपंचायत तर शहारामध्ये महापालिकेच्या माध्यमातून तिरंग्याचे वाटप करण्यात आले आहे. असे असतानाच पुणे महापालिकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये काही चुका असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या निदर्शणास आले आहे. त्यामुळे पुणे शहरात रस्त्याच्या बाजूला गेटवर लावलेले झेंडे संभाजी ब्रिगेडनं काढायला सुरवात केली आहे. यामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये हा उद्देश आहे.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी

महापालिकेने वाटप केलेल्या झेंड्यामध्ये रंग वेगवेगळे, अशोक चक्र तिरपे अशा चुका झाल्या आहेत. त्यामुळे झेंडे बनवण्याचे कंत्राट कुणाला दिले असा सवाल आता संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. एवढेच नाहीतर याची चौकशी होऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम बापू कामठे यांनी व पदाधिकाऱ्यांनी हे झेंडे काढण्यास सुरवात केली आहे.