Ajit Pawar: ठाणेकर समस्यांनी त्रस्त अन् मुख्यमंत्री सत्कार समारंभात व्यस्त, ‘सीएनजी’ तुटवड्यावरुन पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

राज्याच्या राजधानीसह ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून 'सीएनजी' चा तुटवडा भासत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय तर होत आहे पण प्रवाशांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही यावर कोणताही तोडगा राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही. मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोलपंपावर रिक्शा, टेम्पो, कार आदी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी कित्येक तास अधिक वेळ रांगेत थांबावं लागत आहे.

Ajit Pawar: ठाणेकर समस्यांनी त्रस्त अन् मुख्यमंत्री सत्कार समारंभात व्यस्त, 'सीएनजी' तुटवड्यावरुन पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
विरोधी पक्षनेते अजित पवार
राजेंद्र खराडे

|

Aug 13, 2022 | 10:46 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते पदी (Ajit Pawar) अजित पवार यांची वर्णी लागल्यापासून सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावरुन त्यांनी टीकास्त्र केले त्यानंतर अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असून त्याच्या भरपाईसाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असताना त्यांनी ठाण्यातील वाहनधारकांचा मुद्दा उपस्थित करीत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्यामध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेली (CNG) सीएनजीची समस्या जाणवत आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असून मुख्यमंत्री हे नुकसान पाहणीच्या निमित्ताने सत्कार समारंभात व्यस्त असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील सीएनजी चा प्रश्न मार्गी लागणार की नाही हे पहावे लागणार आहे.

‘सीएनजी’ ची टंचाई, वाहनांच्या रांगाच रांगा

राज्याच्या राजधानीसह ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘सीएनजी’ चा तुटवडा भासत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय तर होत आहे पण प्रवाशांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही यावर कोणताही तोडगा राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही. मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोलपंपावर रिक्शा, टेम्पो, कार आदी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी कित्येक तास अधिक वेळ रांगेत थांबावं लागत आहे. त्यातून अनेकांचा रोजगार बुडत आहे. बहुतांश पेट्रोलपंपांवरचा सीएनजी साठा संपला आहे. जिथं साठा आहे तिथं कमी दाबानं पुरवठा होत असल्याने हाल सुरु आहेत. नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

इंधनाच्या दरवाढीने नागरिक त्रस्त

पेट्रोल, डिझेलसह सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा तुटवड्यामुळे रिक्शा, टॅक्सी, टेम्पो आदी प्रवासी वाहनचालकांचा रोजगार बुडत आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत असताना मुंबई, ठाण्यातील सीएनजी टंचाई आणि खड्यांमुळे प्रवाशांचे जात असलेले बळी हे राज्य सरकारसाठी लाजीरवाणी बाब असल्याचेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

सत्कार समारंभावरुन टीका

मुख्यमंत्री हे नुकसान पाहणीसाठी जात आहेत पण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याऐवजी सत्कार समारंभातच व्यस्त आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन खरोखरच गंभीर आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झाली पण अमंलबजावणीचे काय असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें