जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी

ज्योती आमगे आणि कुटुंब बाहेर गेले असताना चोरांनी त्यांच्या नागपुरातील घरात डल्ला मारला

जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी

नागपूर : सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जागतिक विक्रमाची नोंद झालेल्या ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाली आहे. ज्योती यांच्या नागपुरातील घरात चोरीची घटना (Theft at shortest lady Jyoti Amage) घडली.

ज्योती आमगे नागपुरातील बगडगंज भागात राहतात. कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्या होत्या. रात्रीच्या वेळेस त्या परत आल्या. आमगे कुटुंबीय ज्योती यांना आणण्यासाठी नागपूर विमानतळावर गेलं होतं. घरात कोणीच नसल्याची संधी साधत दरम्यानच्या काळात चोरांनी घरात हात साफ केले.

आमगे कुटुंबाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला आहे.

कपाटातील तिजोरी फोडून अंगठी आणि पैसे चोरीला गेल्याची माहिती ज्योती यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकारामुळे आपल्याला जबर धक्का बसल्याचं ज्योती यांनी सांगितलं.

दादरच्या पठ्ठ्याने मुंबई महापालिकेला खड्डे दाखवून कमावले…..

ज्योती आमगे यांची उंची दोन फूट सहा इंच इतकी आहे. ‘अकॉड्रोप्लासिया’मुळे ज्योती यांची उंची वाढू शकली नाही. त्यांचं वय 25 वर्ष असलं, तरी त्या पाच वर्षांच्या चिमुकलीच्या उंचीइतक्या दिसतात.

जागतिक दर्जाच्या ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ज्योती यांची सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

फेक लग्नाचा मनस्ताप

ज्योती आमगे यांना मनस्ताप सहन करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. ज्योती यांचे अमेरिकेतील एका युवकासोबत लग्न झाल्याची पोस्ट 2017 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे ज्योती यांना दररोज शेकडो फोन येत असत. त्यामुळे प्रत्येकाला ही पोस्ट ‘फेक’ असल्याचे सांगण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. या पोस्टमुळे ज्योती आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

Theft at shortest lady Jyoti Amage

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *