दादरच्या पठ्ठ्याने मुंबई महापालिकेला खड्डे दाखवून कमावले.....

महापालिकेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते बुजवणे आवश्यक होतं. अन्यथा तक्रारदाराला 500 रुपये बक्षीस द्यावं लागणार होतं.

दादरच्या पठ्ठ्याने मुंबई महापालिकेला खड्डे दाखवून कमावले.....

मुंबई :  मुंबईतील एका जागरुक तरुणाने महापालिकेला खड्डे (BMC Pothole complaints) दाखवून बक्कळ कमाई केली आहे. मुंबई महापालिकेला (BMC Pothole complaints) खड्डे दाखवून एका पठ्ठ्याने तब्बल 5 हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. प्रथमेश चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे. तो दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशी आहे. महापालिकेने राबवलेल्या खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा या मोहिमेअंतर्गत, प्रथमेशने सर्वाधिक 50 तक्रारी दाखल केल्या होत्या.

महापालिकेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते बुजवणे आवश्यक होतं. अन्यथा तक्रारदाराला 500 रुपये बक्षीस द्यावं लागणार होतं. प्रथमेशने दाखवलेले 10 खड्डे बीएमसीने 24 तासांच्या आत बुजवले. मात्र अन्य खड्डे बुजवता न आल्याने, महापालिकेला त्याला 5 हजार रुपयांचं बक्षीस द्यावं लागलं.

खड्डे दाखवा आणि 500 रुपयांचं बक्षीस मिळवा ही मोहीम मुंबई महापालिकेने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राबवली. खड्डे दाखवल्यानंतर ते 24 तासांच्या आत बुजवावे लागणार होते, अन्यथा अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशातून बक्षीसाची रक्कम दिली जाणार होती.

या मोहिमेदरम्यान मुंबई महापालिकेकडे जवळपास दीड हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. तक्रारदारांनी दाखवलेले बहुतेक खड्डे 24 तासांच्या आत बुजवण्यात आले. मात्र काही खड्डे 24 तासांच्या आत बुजवणे पालिकेला जमले नाही. त्यामुळे 155 जणांना बक्षीस द्यावे लागले.

एक व्यक्ती केवळ दोनच तक्रारी करु शकेल अशी अट महापालिकेची होती. मात्र प्रथमेशने त्याला आव्हान देत 50 तक्रारी दाखल केल्या. त्याने केलेल्या तक्रारीनंतर बहुतेक खड्डे बुजवण्यात आले. मात्र 10 खड्डे बुजवू न शकल्याने महापालिकेला प्रथमेशला 5 हजार रुपये द्यावे लागले.

‘मायबीएमसी पॉटहोल फिक्सीट’ या अ‍ॅपवरुन प्रथमेशने आजपर्यंत जवळपास 70 तक्रारी केल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *