Todays Gold Rate : हौस पूर्ण करण्याशिवाय राहू शकत.. सोने स्वस्त होताच महिलांची खरेदीकरिता मोठी झुंबड, थेट..

Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसत आहे. युद्धाला सुरूवात झाल्यापासून सोन्याचे दर घसरताना दिसले. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल. त्यामध्येच महिलांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यास सुरूवात केली.

Todays Gold Rate : हौस पूर्ण करण्याशिवाय राहू शकत.. सोने स्वस्त होताच महिलांची खरेदीकरिता मोठी झुंबड, थेट..
Todays Gold Rate
| Updated on: May 15, 2026 | 12:35 PM

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल वीस हजार रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 62 हजार 225 तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 73 हजार 980 रुपये झालेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या त्याचा थेट सुवर्णनगरीवर परिणाम पडलाय. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर झाला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्यात गुंतवणूक वाढली. सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदार बाहेर पडल्याने दरकमी झाल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती. सोन्या चांदीच्या किमती घसरल्याने पुन्हा दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी एक वर्षाकरिता करू नये, असे आवाहन केले.

पुढच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या – चांदीच्या दरात घसरण होताच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण झाली. आज सकाळीच सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

दोन दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सराफा दुकानमधील ग्राहकांची संख्या कमी झाली होती. दर कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाकडे पाठ फिरवत नागरिकांकडून दागिन्यांची खरेदी सुरू केली. दर कमी झाल्याने खरेदी करायला आलो, दागिन्यांच्या खरेदी तसेच हौस पूर्ण करण्याशिवाय राहू शकत नसल्याच्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत.

विदेशी चलनावर दबाव येऊ नये, याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. या अहवानानंतरही आज दर कमी होताच लोकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जात आहे. पुढील एक वर्षात सोन्याचे भाव गगणाला पोहोचण्याची शक्यता असल्याने आज दर कमी होताच लोक थेट सोने खरेदी करण्याकरिता दुकानात पोहोचल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us