AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : आजही सोने स्वस्तच, चांदीच्या भावातही मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव..

Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावावर मोठा परिणाम झाला. सोने सतत स्वस्त होताना दिसत आहे. त्यामध्येच आजही सोने स्वस्त झाले. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात कर वाढवल्यानंतरही सोन्याचे भाव कमी होत आहेत.

Todays Gold Rate : आजही सोने स्वस्तच, चांदीच्या भावातही मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव..
Todays Gold Rate
| Updated on: May 15, 2026 | 10:46 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने न खरेदी करण्याचे आवाहन जनतेला केले. त्यानंतर दोन दिवस सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली. आता काल आणि आज 15 मे 2026 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवसी सोन्याच्या कितमीमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,500 ने घसरून 1,60,530 झाला. चांदीच्याही भावात घसरण नोंदवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 6 टक्के सोन्यावरील आयात करत वाढून थेट 15 टक्के केला. मात्र, तरीही सोने आणि चांदीच्या किमती घसरताना दिसत आहेत. परकीय चलनावरील दबाव वाढू नये, याकरिता सरकारने सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून रूपयांची घसरण होत आहे. त्यामध्येच सोने खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले.

सलग दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1, 62,340 आहे. तर 11 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,810 आहे. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,270  आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,48,930 आहे. सोन्यावरील आयात कर वाढवला असला तरीही सोन्याचा भाव घसरताना दिसत आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,64,190 वर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,50,510आहे. पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,340 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,810 आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात चढउतार बघायला मिळेल. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. तेव्हापासून सोन्याच्या किमती घसरताना दिसल्या. त्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. या युद्धाचा मोठा फटका सोन्याला बसला. त्यामध्येच आता सोने न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे याचा सोन्याच्या बाजारावर नक्की काय परिणाम होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भारतात गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमती वाढताना दिसल्या.

Follow Us
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....