‘मला धमकी देऊन माझ्या डिसिजनमध्ये …, ‘ तुकाराम मुंढे यांचा व्हिडीओ का होतोय व्हायरल
तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. एफडीएचे कमिशनर झाल्यापासून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा नव्हे जीवनाशीच थेट संबंध असलेला अन्नभेसळीचा विषय हाती घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

तुकाराम मुंढे म्हणजे बस नामही काफी है. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांची या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी या खात्याला इतके काम असते हे लोकांना माहिती नव्हते. किंवा अन्न भेसळ तर होणारचा त्याला कसे रोखणार असा लोकांचा समज होता.आता या पदाचा पदभार घेतल्यानंतर ज्याला काम करायचे असते तो अशा पदावनतीत ही संधी शोधतोच तसा मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे.त्यामुळे आजच्या भ्रष्ट व्यवस्थेत कोणीतरी इमानदार बंदा निघावा अशी लोकांच्या अतृत्प इच्छा त्यांच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे असेच म्हटले जात आहे.या तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आयएएस तुकाराम मुंढे यांचे समाजमाध्यमावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांच्या कामगिरीचे सामान्य जनतेला असलेले कौतूकाचे व्हिडीओ ढीगाने पाहिले जात आहेत. त्यातच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले जात आहे.या व्हिडीओ तुकाराम मुंढे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धमकीचे पत्र आल्याचे सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओत आपल्याला आलेले हे चौथे पत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धमकी देऊन कोणी माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो कधीच यशस्वी होणार नाही असे या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणताना दिसत आहेत.
जुना व्हिडीओ व्हायरल
आपल्यात जर काही त्रुटी असेल जर ती खरोखरच दुरुस्त करण्यासारखी असेल तर मी त्याचे स्वागत करतो. मात्र, त्यात काही तथ्य नसेल तर आपण फिकीर करत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आणि मला पुरेशी सुरक्षा आहे. मी धमकी देणाऱ्यांची कधी पर्वा केलेली नाही. मला रात्रीच्या सुरक्षेची काही गरज नाही. माझ्या सोबत शस्रधारी सुरक्षा रक्षक असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. हा व्हिडीओ ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएल) व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांना आलेल्या धमकीचा आहे. मुंढे यांना एकाच आठवड्यात दोनवेळा जीवे मारण्याची धमकी त्यावेळी आली होती. तेव्हा त्यांनी आपल्या धमकी देणाऱ्यांनी आपला बायोडेटा पाहावा असेही म्हटले होते.